Raju Patil: पालकमंत्रिपद कशासाठी ? सेवा करायला की मेवा खायला; मनसे माजी आमदार संतप्त

Former MNS MLA Raju Patil questions the purpose of Guardian Minister roles: रायगडला पोर्ट आहे, वाढवण बंदर येतोय पालघरला.. गडचिरोलीला खदानी आहेत, हे कशासाठी पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून काय सेवा करायची की का मेवा खायचा
mns news
mns news Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai 21 Jan 2025: राज्यात पालकमंत्रिपदावरून महायुती सरकारमध्ये राजकीय गदारोळ सुरू असताना नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पद स्थगित करण्यात आले आहे. मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना शिंदे गटाला टोला लगावला आहे.

"पालघर, रायगड, गडचिरोली यांची पालकमंत्रिपद हवीत कशासाठी ? सेवा करायला की मेवा खायला ? हे राजकारण्यांना माहीत आहे. त्यामुळे जे काय चाललंय ते त्यांना लखलाभो," असे टोला राजू पाटील यांनी 'x'वर लगावला आहे.

mns news
Donald Trump: राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी तीन ऐतिहासिक हत्यांबाबत घेतला मोठा निर्णय

महायुती सरकारमधील पालकमंत्रिपदाचे वाटप करण्यात आले आहे. अनेक मंत्र्यांची पालकमंत्री पदी वर्णी न लागल्याने मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळली आहे. पालकमंत्रिपदावरून रायगडमध्ये मोठा राडा देखील झाला. गोंधळानंतर महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली पहायला मिळत आहेत. यावर आता मनसेचे नेते, माजी आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

mns news
BJP News: भाजप मंत्र्यांसाठी RSSचा ‘क्लास’; मोदींनंतर संघानं दिला 'कानमंत्र'; जबाबदारी, अपेक्षा...

ते म्हणाले,"पालकमंत्री पद कुठलं पाहिजे गडचिरोली, पालघर, रायगड..कारण रायगडला पोर्ट आहे, वाढवण बंदर येतोय पालघरला.. गडचिरोलीला खदानी आहेत, हे कशासाठी पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून काय सेवा करायची की का मेवा खायचा हे आमच्यासारख्या राजकारणाला माहीत आहे. लोकांना ते माहीत नाही. डीपीडीसीमध्ये आम्ही पाहतो की केलेल्या मागण्या काही पूर्ण होत नाही. त्यामुळे ठीक आहे, जे काय चाललंय ते त्यांना लखलाभो.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहे. यावर राजू पाटील आपली प्रतिक्रिया देत शिंदेंना चिमटा काढला आहे. "आमची सर्वांची अपेक्षा होती की गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे आणि ते असते तर आगरी समाजाला ही न्याय मिळाला असता ही अपेक्षा येथील लोकांची होती त्या अनुषंगाने मी बोललो की पालकमंत्रिपद आगरी लोकांना ठेंगा दाखवून गेले आणि शेवटी मुख्यमंत्री असताना आमच्या भागात काय झाले नाही तर पालकमंत्री असताना काय होणारे थोड्या आमच्या अपेक्षा होत्या परंतु त्या पूर्ण झाल्या नाहीत, असे त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com