Prakash Ambedkar and Amit Shah Sarkarnama
पुणे

Prakash Ambedkar On Amit Shah: अमित शाहांच्या बुद्धीची कीव येते; प्रकाश आंबेडकरांची भाजपसह 'आरएसएस'वर टीका

Prakash Ambedkar On BJP : वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर सडकून टीका केली

सरकारनामा ब्यूरो

Pimpri News: देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या लाखो भारतीयांच्या संघर्ष व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी भाजप ‘विभाजन विभीषिका दिवस’ पाळणार आहे.

यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सडकून टीका केली आहे. भाजप आणि 'आरएसएस'चे व्देषाचे राजकारण सुरु असून धर्म आणि समाजात भांडणे लावणाऱ्या भाजपपासून सावध राहण्याचे आवाहन आंबेडकरांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केले.

"जातीय आणि धार्मिकतेला धरून पुन्हा देशाची नव्याने फाळणी करायची आहे का", अशी जळजळीत विचारणा त्यांनी भाजपला केली. तसेच फाळणी दिन पाळण्याचा आदेश दिलेल्या अमित शाह यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

"नव्या पिढीपासून आपला इतिहास लपविण्याचे काम त्यांचे सुरु असून त्यासाठी कावळ्याला वॉशिंग मशिनमध्ये घालून पांढरा करायचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे", असा घणाघातही आंबेडकरांनी केला.

चुकीचा इतिहास पसरवायचा नसतो, पण या निमित्ताने ते दुर्दैवाने भाजप करीत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. १५ ऑगस्टला भाजप गावोगावी शिलान्यास बसविणार असून त्यावर फक्त नरेंद्र मोदी यांचे नाव असण्याला त्यांनी आक्षेप घेतला आहे. आतापर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांची नावे त्यावर कोरण्याची मागणी त्यांनी केली.

'आरएसएस'लाही आंबेडकरांनी लक्ष्य केले. त्यांचा स्वातंत्र्याचा इतिहास नसून उलट ते ब्रिटीशांचे हस्तक होते, असा आरोप त्यांनी केला. संविधान, तिरंगा, व्यक्तीस्वातंत्र्य मान्य नसल्यानेच 'आरएसएस'वर सरदार वल्लभभाई पटेल यांनी बंदी घातली होती.

हा पवित्रा त्यांनी बदलल्यानंतर ही बंदी उठविण्यात आली आणि त्यांच्या नेत्यांची तुरुंगातून सुटका झाली, असे ते म्हणाले. १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन 'आरएसएस'ने १९५० ला साजरा केला, तर १५ ऑगस्ट हा दिवस काळा दिवस पाळण्याची प्रथा सुरु केली, असा घणाघाती आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT