Eknath Shinde On Thane Hospital Death : ठाण्यातील रुग्णालयात मृत्यूचे थैमान, मुख्यमंत्री 'अॅक्शन मोड'वर; दिले 'हे' महत्वाचे आदेश

Thane News : '' ही घटना शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली असून...''
Eknath Shinde On Thane Hospital Death
Eknath Shinde On Thane Hospital DeathSarkarnama
Published on
Updated on

Satara : ठाण्यात दोन दिवसांपूर्वी पाच रुग्ण दगावल्याची घटना ताजी असतानाच छत्रपती शिवाजी रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण दगावलल्याने संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर स़डकून टीका केली जात आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील घटनेनंतर 'अॅक्शन मोड'वर आले आहेत. त्यांनी प्रशासनाला महत्वाचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे सध्या त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी आहेत. ठाण्यातील घटनेवर त्यांनी भाष्य केले. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Eknath Shinde On Thane Hospital Death
Supriya Sule On Thane Hospital Incident : ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये एका रात्रीत १७ रूग्ण दगावले; सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांना म्हणतात...

शिंदे म्हणाले, ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय घटना दुर्दैवी असून याबाबत सकाळीच माहिती घेतलेली आहे. व आरोग्ययंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. ही घटना शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली असून सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यातून जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, यातील काही रुग्ण हे अत्यंत क्रिटिकल स्थितीत दाखल झाले होते, काही रुग्ण खासगी रुग्णालयातूनही संदर्भित झाले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने वेगवेगळ्या दिवशी हे रुग्ण याठिकाणी दाखल झाले होते. या अत्यंत वेदनादायी घटनेबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत(Tanaji Sawant) यांच्याशीही बोलणे झाले असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आरोग्य यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Eknath Shinde On Thane Hospital Death
India Alliance News: मोदी सरकारला सत्तेपासून रोखण्यासाठी मुंबई ठरणार 'गेम चेंजर'? पवारांनी सांगितली रणनीती

या प्रकरणाची नि: पक्षपातीपणे चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणे गरजेचे आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. त्यात आरोग्य संचालक, महापालिका आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी, जेजे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ डॉक्टर यांचा समावेश आहे.

ठाणे(Thane) महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून या घटनेची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. रुग्ण नातेवाईकांनी केलेल्या तक्रारी स्वतः समितीपुढे मांडणार असून जेणेकरून सर्वच बाजूने चौकशी करून समितीला निष्कर्ष काढणे शक्य होणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

Eknath Shinde On Thane Hospital Death
Devendra Fadnavis On Pawar Meeting: ''...त्यामुळे मी तुमच्या ज्ञानात भर घालू शकत नाही!''; पवारांच्या 'गुप्त' भेटीवर फडणवीस थेटच बोलले

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून या घटनेची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. रुग्ण नातेवाईकांनी केलेल्या तक्रारी स्वतः समितीपुढे मांडणार असून जेणेकरून सर्वच बाजूने चौकशी करून समितीला निष्कर्ष काढणे शक्य होणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com