Vasant More on Pune Night life:
Vasant More on Pune Night life Sarkarnama
पुणे

Pune Porsche Accident: पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते...; नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का?

Sudesh Mitkar

Pune News: कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून भाजप नेते मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी यात उडी घेतली आहे. नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्कमध्येच आहे का ? असा सवाल त्यांनी केला आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठवण्यात आला असून त्याच्या वडिलांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. एकीकडे या प्रकरणात न्यायालयीन लढाई सुरू असतानाच दुसरीकडे मात्र राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहेत. स्थानिक पातळीवर मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. वरिष्ठ पातळीवर देखील राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तर देण्यात येत आहे. त्यातच आता वसंत मोरे यांनी उडी घेतली असून काही सवाल त्यांनी पुण्यातील स्थानिक नेत्यांना केले आहेत.

सोशल मीडिया पोस्टद्वारे वसंत मोरे म्हणाले, कोरेगाव पार्क मध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता. पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येत आहे. शहरात नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का ? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूड मधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावे, सोबतच भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशी कडेही लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी नाव न घेता मुरलीधर मोहोळ यांना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच ज्यांनी निवेदन दिली त्यांनी सुद्धा एन आय बी एम कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावे, नाहीतर असं म्हणावं लागेल कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणि वरील भागांमध्ये नाईट लाईफ साठी जाणारी तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का ? असा सवाल करत त्यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर देखील अप्रत्यक्ष निशाणा साधला.

कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफ मध्ये लागेबांधे आहेत, भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील. पोलिस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टारगेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठे हिंसक आंदोलन झाली तर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल असा इशारा देखील वसंत मोरेंनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT