Vasant More joins Shiv Sena Sarkarnama
पुणे

Vasant More Breaking : पुण्यातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची भेट घेतलेल्या वसंत मोरेंना धमकी,पोलिस बंदोबस्त वाढवला

Deepak Kulkarni

Pune News : लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम ठोकत वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्यांनी वंचितकडून रोडरोलर हे चिन्ह घेत पुण्यातून लोकसभा निवडणुकही लढवली होती. या निवडणुकीत त्यांना दारुण पराभव स्विकारावा लागला. आता काही महिन्यांतच 'वंचित'ला बाय-बाय करत गुरुवारी (ता.4) शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीनंतर ते येत्या 9 जुलैला शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अशातच आता वसंत मोरे (Vasant More) यांना धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

वंचितकडून पुण्यातील कात्रजमधील वसंत मोरे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोरे यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन 9 जुलैला पक्ष प्रवेश करणार असल्याबाबत वक्तव्य केल्यानंतर ही धमकी दिल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) मातोश्रीवर जाऊन भेट घेताच वसंत मोरेंना त्यांचं कार्यालय फोडण्याची धमकी मिळाल्यानं पुण्यात एकच खळबळ उडाली. वंचित आघाडीच्या हडपसरमधील सरोदे नावाच्या एका कार्यकर्त्यानं चक्क कात्रजच्या मोरे बागेतील कार्यालय फोडण्याची धमकी दिली आहे.

या धमकीनंतर मोरे समर्थकांनी कार्यालय परिसरात गर्दी केली आहे. अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेत आता पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. आता या वंचितच्या कार्यकर्त्यावर काही कारवाई केली जाते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

वंचितकडून वसंत मोरे यांच्या कार्यालयावर आंदोलन करत कार्यालयाची तोडफोड करणार असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी वसंत मोरे यांच्या कार्यालयाबाहेर सगळा बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जातेय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT