Vasant More: वसंत मोरे वाढवणार शरद पवारांच्या शिलेदारांचे टेन्शन

Vasant More will contest Hadapsar assembly constituency: वसंत मोरे हे 34 हजार मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. चेतन तुपे यांचा विजय सुकर करण्यात आणि टिळकरांना पराभूत करण्यात वसंत मोरे फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता.
Vasant More
Vasant MoreSarkarnama

Pune News: वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे (Vasant More) आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशा बाबत देखील निर्णय होऊ शकतो.

वसंत मोरे यांचा पक्षप्रवेश झाल्यास मोरे हे हडपसर किंवा खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते इच्छुक आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे हडपसर (Hadapsar)विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. तर दुसरीकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्ती असणारे सचिन दोडके हे इच्छुक आहेत.

त्यामुळे या दोन्ही जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा आग्रही आहे. अशातच जर वसंत मोरे यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश झाल्यास यातील किमान एक तरी जागा महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला सोडावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या घडत असलेला राजकीय घडामोडींमुळे शरद पवारांच्या (Sharad Pawar)शिलेदारांचं टेन्शन वाढल्याचं बोललं जात आहे.

Vasant More
Vasant More Meet Uddhav Thackeray : वसंत मोरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला, ठाकरे गटात करणार प्रवेश ?

वसंत मोरे हे 2019 ची निवडणूक हडपसर विधानसभा मतदारसंघातून लढले होते त्यांनी ही निवडणूक मनसे कडून लढवली होती. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांनी अवघ्या अडीच हजारच्या फरकाने भाजपच्या योगेश टिळेकर यांचा पराभव केला होता. वसंत मोरे हे 34 हजार मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. चेतन तुपे यांचा विजय सुकर करण्यात आणि टिळकरांना पराभूत करण्यात वसंत मोरे फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता.

यावेळी महायुतीकडून आमदार चेतन तुपे हे हडपसर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून प्रमुख दावेदार आहेत. मागील वेळेस भाजपकडून निवडणूक लढलेल्या योगेश टिळेकरांचं पुनर्वसन भाजपकडून करण्यात आला आहे. विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे .त्यामुळे या जागेसाठी शिंदे गटाकडून शहर प्रमुख नाना भानगिरे आणि अजित पवार गटातून चेतन तुपे यांच्यामध्ये चुरस आहे.

Vasant More
Ladki Bahin Yojana:...तर दीड हजारांसाठी रांगेत उभे राहण्याची वेळ येणार नाही; 'लाडकी बहीण' बरोबर ही योजना आणा!

तर महाविकास आघाडीचा विचार केल्यास हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. आता जर ठाकरे गटांमध्ये वसंत मोरे यांचा प्रवेश झाल्यास विधानसभा मतदारसंघातील सर्व समीकरण बदलू शकतात.

वसंत मोरे फॅक्टर हा विधानसभा निवडणुकीत जेवढा महायुतीच्या उमेदवारांसाठी करणार आहे तितकाच त्रासदायक महाविकास आघाडीसाठी देखील राहणार आहे. त्यामुळे वसंत मोरे यांचा प्रवेश होणार का? झाल्यास तो महायुतीच्या जागा वाटपासाठी त्रास त्रासदायक ठरणार का? आणि मागच्या वेळी वसंत मोरे फॅक्टरचा फायदा झालेले व चेतन तुपे यांना याचा किती फटका बसणार हे पाहावे लागले.

(Edited by: Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com