Vasant More News Sarkarnama
पुणे

Vasant More News : वसंत मोरेंचं 'इमोशन कार्ड?' मनसेच्या कार्यकर्त्यांना भावनिक साद?

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांनी मनसेच्या मतदारांना एकप्रकारे भावनिक साद घातली आहे. मात्र या इमोशनल कार्डचा त्यांना काही फायदा होतो का?

Chetan Zadpe

Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, मतदान प्रक्रीया सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती पणाला लावण्यात आली. दरम्यान पुर्वाश्रमीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे विद्यमान उमेदवार वसंत मोरे यांनी मतदानाच्या पार्श्वभूमीवर 'जबरदस्त इमोशन कार्ड' खेळले आहे. (Lok Sabha Election 2024)

आज पुणे लोकसभेसाठी मतदान पार पडत असताना वंचितच उमेदवार वसंत मोरे यांना आपल्या पुर्वाश्रमीचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्मरण झाले आहे. 'राजसाहेब मला माफ करा,' अशी भावनिक साद घालत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीची लोकसभेची उमेदवारी मिळवली. वंचितमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुती कडून मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणे लोकसभेची निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही, असा इशारा मोरे यांनी दिला होता. त्याप्रमाणे वंचितचा गमचा गळ्यात घालून मोरे लोकसभेच्या मैदानात उतरले.

प्रथमदर्शनी दोघांची चुरस वाटणारी पुण्याची लढत मोरे यांच्या एन्ट्रीमुळे तिरंगी झाली. आज आता मतदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या पूर्वाश्रमीचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अन् मनसेच्या कार्यकर्त्यांना एकप्रकारे भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाच्या पुण्याच्या नवी पेठ येथील शहर मध्यवर्ती कार्यालयाला रात्री उशीरा मोरे यांनी हात जोडून दर्शन घेतले. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मोरे म्हणतात, "आयुष्यात मोठे व्हायचे स्वप्न मनसेत पाहिले होते. उद्या माझ्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी लढाई लढत आहे. त्यापूर्वी ज्या ठिकाणावरून सुरुवात केली, त्या ठिकाणचे आज दर्शन घेऊन उद्याची भाजपा विरोधातील मोठी लढाई लढतोय."

'पुणे मनसे म्हणजे वसंत मोरे आणि वसंत मोरे म्हणजे पुणे मनसे' असे समीकरण मोरे मनसेमध्ये असेपर्यंत होते. यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांशी त्यांची घट्ट नाळ जुळलेली आहे. यामुळेच मनसेच्या कार्यालयाचे दर्शन घेऊन त्यांनी (Vasant More) 'इमोशन कार्ड' खेळण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा आहे.

मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांनी मनसेच्या मतदारांना एकप्रकारे भावनिक साद घातली आहे. मात्र या इमोशनल कार्डचा त्यांना काही फायदा होतो का? 4 जून रोजीच्या हे निकालातच दिसून येणार आहे.

(Edited - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT