Pune Lok Sabha Election Voting : हु इज धंगेकर? नंतर चंद्रकांतदादांचा आणखी एक इंग्लिश डायलॉग

Lok Sabha Election 2024 Voting LIVE Updates in Marathi: लोक थांबून थांबून मी मतदान केलं असल्याचं सांगत असून 'बॉडी लँग्वेजेस क्लियर' मतदान खूप 'वनवे' चाललं असल्याचं स्पष्ट दिसत आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
Pune Lok Sabha Election Voting
Pune Lok Sabha Election VotingSarkarnama

Pune Lok Sabha News: पुणे लोकसभेचे मतदान (Pune Lok Sabha Election Voting) सुरु आहे. भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरूडमध्ये आज मतदान केलं. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे इंग्रजीमधील डायलॉग यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये देखील चर्चेचा विषय बनले होते. पोटनिवडणुकीमध्ये हु इज धंगेकर? हा त्यांचा डायलॉग चर्चेत राहिल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमी त्यांनी आणखी एक इंग्रजी डायलॉग मारला आहे.

मतदानानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, एका सामान्य मतदारांप्रमाणे रांगेमध्ये उभे राहून मतदान केले याचा आनंद आहे. यामुळे नागरिकांशी संवाद साधता आला. काँग्रेसकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आरोप कोणी कोणावर काही करू शकतो.

मात्र रात्री हा विषय संपला असून पुणे पोलिस आयुक्तांनी मध्यस्थी करून फक्त आरोप करून कुणालाही अटक करता येत नाही त्यामुळे पुरावे देऊन तक्रार द्यावी, अशी विनंती केली होती. त्यावरून तक्रार दिली असून पोलिस आता त्यांच्या काम करीत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Pune Lok Sabha Election Voting
Ajit Pawar on Medical College: कॉलेजच्या नामकरणावेळी बारामतीकरांना बरोबर घ्यायला हवं होतं; अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी

पुण्यामध्ये मतदारांचा उत्सव फार चांगला आहे. फक्त कोथरूडमध्येच नव्हे तर संपूर्ण पुण्यामध्ये मतदारांमध्ये चांगला उत्साह आहे. शहरात 700 केंद्र आहेत आणि 2100 बूथ असून सकाळपासून मॉनिटर करीत आहे. सर्व दूर अशाच प्रकारची गर्दी आणि उत्साह आहे.

मतदारांची बॉडी लँग्वेज पाहिली तर हे मतदान भारतीय जनता पार्टीच्या आणि मोदींच्या दिशेने आहे हे समजू शकत. लोक थांबून थांबून मी मतदान केलं असल्याचं सांगत असून 'बॉडी लँग्वेजेस क्लियर' मतदान खूप 'वनवे' चाललं असल्याचं स्पष्ट दिसत आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुकीमध्ये लोक नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मतदान करीत आहे. जास्त मताधिक्याने नरेंद्र मोदी यांचा विजय झाला तर भारतात मजबूत सरकार येईल, असा मेसेज जाईल आणि त्याचा फायदा देशाला होईल त्यामुळे मोठ्या संख्येने लोक मतदान करीत आहेत.

शरद पवारांचा या निवडणुकीमध्ये पराभव करायचा आहे, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये जाऊन केलं होतं. त्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जाते त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्या व्यक्तीचा मतदानावरील कोणताही परिणाम झाला नसून अजित पवारांनी कोणत्याही प्रकारची नाराजी व्यक्त केली नसल्याचं स्पष्टकरण त्यांनी दिला आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com