Vasant More
Vasant More Sarkarnama
पुणे

Vasant More : आयो...! हे काय करतायेत वसंत मोरे...

सरकारनामा ब्युरो

Vasant More News : मनसे नेते वसंत मोरे हे काहीना काही कारणाने चर्चेत असतात. पक्षाकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होते. इतकेच नव्हे तर कधी कार्यकर्ते, मतदार आणि गरीबांना मदतीला धावून जाण्याच्या मुद्द्यावरुनही ते अनेकदा चर्चे असतात. विशेष म्हणजे पुण्यातील मनसेचे प्रभावी नेते म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. असे असताना आता पुन्हा एकदा वसंत मोरे चर्चेत आले आहेत.

पण ही चर्चा राजकीय नाही बरं का. वसंत मोरे यांनी स्वत: चा एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंट वरुन शेअर केला आहे. यात ते चक्क एका चहाच्या टपरीवर चहा बनवताना दिसत आहेत. व्हिडीओला त्यांनी कॅप्शनही तसं भन्नाट आहे. त्यामुळे वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांच्या या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

वसंत मोरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर अवघ्या 37 सेकंदाचा चहा बनवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. चहापत्ती, साखर टाकल्यानंतर त्यात आलं किसून टाकताना दिसत आहेत. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी मुळशी पॅटर्न या मराठी सिनेमातलं ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल… हे गाणं बॅकग्राऊंडला लावलं आहे. पाच लाख 44 हजार लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ आतापर्यंत पाहिला असून 26 हजारहून अधिक लोकांनी त्यांच्या या व्हिडीओला लाइक केलं आहे.

तसेच, ब्रँड तयार करायचा म्हटलं ना की स्वतः झिजाव लागतं… #mount88 ला स्पेशल चहा बनवला… मग येताय ना चहा नाष्टा आणि REDDY’S TANDOOR ची तंदूर खायला…बोपदेव घाट संपला की फक्त 5 मिनिटांवर भिवरी बोपगाव, सासवड रोड, अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओ शेअर करताना लिहीली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT