Maharashtra Politics : ठाकरेंच्या आधीच शिंदे सर्वोच्च न्यायालयात कव्हेट दाखल, वाचा सविस्तर

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे जाहीर केलं होतं
Maharashtra Politics :
Maharashtra Politics :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Politics : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे जाहीर केलं होतं. त्यानंतर आता शिंदे गटही सक्रीय झाला असून शिंदे गटाकडून न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने आव्हान दिल्यास एकतर्फी सुनावणी घेऊन आदेश न देता आमचीही बाजूही ऐकून घेतली जावी, अशी विनंती या ‘कॅव्हेट’च्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Maharashtra Politics :
Eknath Shinde : शिवसेना मिळाल्यानंतर शिंदे ॲक्शन मोडवर; बोलवली तातडीची बैठक; आखणार मास्टर प्लान?

एकीकडे न्यायालयात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसह अन्य आठ महत्त्वाच्या विषयांवर सुनावणी सुरू आहे. उद्यापासून (२१ फेब्रुवारी) पुन्हा नियमित सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाचा निकाल दिल्यामुळे आयोगाच्या या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ठाकरेंनी सांगितलं होतं. आयोगाच्या या निर्णयाविरोधात आज ठाकरे गटाकडून याचिका दाखल करणार आहे. पण त्याआधीच शिंदे गटाने शनिवारी रात्रीच ‘कॅव्हेट’ दाखल केलं आहे. ठाकरे गटाने आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले तर आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणताही आदेश देऊ नये, अशी विनंतर या याचिकेत करण्यात आली आहे.

त्याचबरोबर शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला गेल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता पुढील भूमिका काय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवरच कायद्याच्या संदर्भात अनेक गोष्टींच्या मार्गदर्शनासाठी ठाकरेंनी राज्यातील काही कायदेतज्ञांची मातोश्रीवर बैठक घेतली. त्यामुळे आता ठाकरेंची पुढील रणनीती काय असणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com