Pune News : मराठीच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर झारखंडमधील भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. यानंतर महाराष्ट्रातून आक्रमक प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनीही आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
झारखंडमधील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी 'एक्स' प्लॅटफॉर्मवर मराठीमध्ये एक पोस्ट केली आहे. यामध्ये "हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रा मधील उर्दू भाषिकांना मारून दाखवा असं म्हटलं आहे.
तसेच आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा." अशा आशयाच्या पोस्टमुळे महाराष्ट्रात प्रचंड अशी संतापाची लाट उसळी आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्यातील नेते वसंत मोरे देखील आक्रमक झाले आहेत.
याबाबत बोलताना वसंत मोरे म्हणाले, खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी अशा प्रकारचे पोस्ट करून वाय झेड करणे बंद करावं. आपटायच्या गोष्टी दुबे यांनी शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना शिकवू नये. आम्ही आपटापटी नाही तर थेट फोडाफोडी करतो. आणि आम्ही बांबू घेऊन नेहमीच तयारीमध्ये असतो त्यामुळे आपटा आपटीच्या गोष्टी तरी दुबे यांनी आमच्या पुढे करू नये असा इशारा वसंत मोरे यांनी दिला.
तसेच दुबे यांना आपटायचं असेल तर त्यांनी पुण्यात आणि मुंबईमध्ये यावं, मग कोण कोणाला आपटतंं आणि फोडतं हे पाहू. दुबे है त्यांच्या मतदारसंघांमध्ये बसून कुत्ता भी अपने गली मे शेर आहे असं बोलत आहेत. मात्र, त्यांनी जे ट्विट केले आहे ते इथे येऊन केला असता तर त्यांना कळालं असतं की शेर कोण आहे.
आपटा आपटी आणि फोडाफोडीचा सातबारा हा आमच्याकडे आहे. याबाबतचे अनेक गुन्हे आमच्यावर दाखल आहेत. त्यामुळे भाजपने अशा वाचाळवीरांना लवकरच आवर घालावा अन्यथा अनेकवेळा मी बांबूचा आणि काहीवेळा हातोड्याचाही वापर केला आहे, असा इशारा वसंत मोरे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.