Sudhir Mungantiwar: मंत्रिमंडळातून डच्चू, भाजपवरची नाराजी अन् ठाकरेंच्या शिवसेनेची ऑफर; मुनगंटीवार मनातलं बोलले...

Shivsena UBT On Sudhir Mungantiwar : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेना (Shivsena) ठाकरे गटात येण्याची ऑफर दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांची स्थिती सध्या भाजपमध्ये चांगली नाही, त्यांनी शिवसेनेत यावं असं अंधारे यांनी म्हटलं होतं.
Uddhav Thackeray and Sudhir Mungantiwar
Uddhav Thackeray and Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नसल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नाराज आहेत. त्यांची पक्षातूनच कोंडी केली जात आहे. याकरिता अधिवेशनात विविध प्रश्न उपस्थित करून महायुती सरकारला धारेवर धरत आहेत अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून हा मुद्दा हेरून त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, मी काही नाराज नाही आणि माझी पक्षातून कोंडीही केली जात नाही. अधिवेशनात गोरगरिबांचे प्रश्न मांडण्यात काही गैर नाही. ते आमदाराचे कर्तव्यच असते. प्रश्न उपस्थित करणे म्हणजे सरकारच्या विरोधात भूमिका घेतली असे होत नाही. दुसरीकडे मंत्री नाही म्हणून प्रश्न मांडणे हेसुद्धा चुकीचे नाही असेसुद्धा त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री होते. महायुतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात वनमंत्री आणि सास्कृतिक खाते त्यांच्याकडे होते. भाजपचे ते प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. हे बघता महायुतीचे सरकार आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांचा पहिल्या पाचमंत्र्यांमध्ये समावेश राहील असे सर्वांनाच वाटत होते. मात्र, सुधीरभाऊंना डावलण्यात आले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी अनुपस्थित होते.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यामुळे मुनगंटीवार पक्षाच्या निर्णयावर नाराज आहेत असे बोलले जात होते. आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपात प्रवेश देण्यास त्यांनी विरोध केला होता. मात्र, त्यानंतरही भाजपच्या नेत्यांनी प्रवेश दिला आणि चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.

Uddhav Thackeray and Sudhir Mungantiwar
Assembly Session : भुजबळांच्या माध्यमातून पटोलेंचा अजितदादांवर निशाणा; ‘उपमुख्यमंत्र्यांच्या दालनातील ‘ती’ बैठक कोणत्या दलालासाठी ऐनवेळी रद्द केली?’

सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मुनगंटीवार यांनी किशोर जोरगेवार यांच्या निधीतून नाल्यावर बांधलेल्या भिंतीची मुद्दा उपस्थित केला. मित्राच्या बंगल्यासाठी 95 लाखांचा निधी त्यांनी खर्च केला, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केले. या भितींच्या बांधकामाची आणि गैरव्यवहाराची चौकशी समितीसुद्धा त्यांनी लावून घेतली आहे.

अलिकडेच त्यांनी अधिवेशनात कामजाच्या इंग्रजी भाषेतील मजकुरावरून सर्वांनाच धारेवर धरले होते. जे इंग्रजी भाषेसाठी आग्रही आहेत त्यांना सरकारने पासपोर्ट कढून लंडनला पाठवा अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली होती. हे बघून मुनगंटीवार नाराज आहेत. ते विविध प्रश्न उपस्थित करून सरकारवर आपला राग काढत आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.

Uddhav Thackeray and Sudhir Mungantiwar
Nishikant Dubey: मराठी लोक कुणाची भाकर खाताहेत? भाजप खासदारानं ओकली गरळ; राज्याबाहेर या! आपटून आपटून मारु....

महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा ऐनवेळी मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला. यानंतर त्यांच्याकडून तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली. तसेच भाजप आपल्याच सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. मंत्रिपदापासून डावलण्यात आल्यानंतर सुधीरभाऊ प्रत्येक अधिवेशनात सरकारला चांगलेच धारेवर धरत आहेत.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेना (Shivsena) ठाकरे गटात येण्याची ऑफर दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांची स्थिती सध्या भाजपमध्ये चांगली नाही, त्यांनी शिवसेनेत यावं असं अंधारे यांनी म्हटलं होतं.तसेच दोन्ही ठाकरे एकत्र आले यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो, डोळ्याचे पारणं फिटलं.  वीस वर्ष लागले या कुटुंबाला एकत्र येण्यासाठी एका फ्रेममध्ये दिसण्यासाठी हा आनंद राज्याला साजरा करू द्या, अशी प्रतिक्रिया या मेळाव्यावर अंधारे यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com