election
election  sarkarnama
पुणे

Chinchwad Bypoll Election : धक्कादायक ; मतदान प्रक्रियेचा भंग ; मतदान करतानाचा Video व्हायरल

सरकारनामा ब्युरो

Chinchwad Bypoll Election News : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत सकाळी दोन गटात हाणामारी झाल्यानंतर पुन्हा एकदा येथे नवा वाद निर्माण झाला आहे. चिंचवडमध्ये गोपनीय मतदान प्रक्रियेचा भंग झाल्याची माहिती समोर येत आहे.

मतदाराकडून ईव्हीएम मशीनवर असलेल्या चिन्हा समोरील बटण दाबून मतदान केल्याचा व्हिडिओ 'साम टीव्ही'च्या हाती लागला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चिंचवड मतदार संघातील निवडणूक अधिकारी काय करत आहे, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

चिंचवडमधील एका मतदान केंद्रात हा प्रकार झाला. निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच हा प्रकार घडल्याने संबधीत अधिकाऱ्यांवर निवडणूक विभाग कारवाई करणार का, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. मतदारांना मतदान केंद्रात आत सोडताना निवडणूक अधिकारी त्यांची तपासणी का करीत नाही, असा प्रश्न मतदारांनी विचारला आहे.

कसबा,चिंचवड विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठीचे मतदान संथगतीने सुरु आहे. उमेदवारांचे कार्यकर्ते मतदारांना घराबाहेर काढत मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. पण मतदारामध्ये निरुत्साह असल्याचे सध्याचे चित्र आहे. दुपारी एक वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 20.68% तर कसब्यात केवळ 18.5% मतदान झाले आहे.

मतदान करण्यासाठी मतदारांनी घराबाहेर पडावे, यासाठी उमेदवारांचे समर्थक नेहमीच अनोखी शक्कल लढवत असतात, अशाच प्रकार आज पुण्यात पाहायला मिळाला. कसबा पेठ पोटनिवडणुकीत मतदारांना बाहेर काढण्यासाठी एका फोरमने हा अनोखा उपक्रम राबविला आहे.

"मतदानाची शाई दाखवा अन् चहा मोफत मिळवा", "मतदानाची शाई दाखवा अन् मोफत पुस्तक घ्या" अशी ऑफर यानिमित्ताने या फोरमने मतदारांना केली आहे. तर महिला मतदारांसाठी 'मतदान करा आणि हातावर मेहेंदी काढून घ्या,' अशी देखील संकल्पना राबवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT