Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Vidhan Sabha Election: लोकसभेला केलेली चूक विधानसभेला करु नका; कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींना आग्रह

Maharashtra Politics Mahayuti Formula of seat allotment: तीनही पक्षामध्ये जागावाटपामुळे रस्सीखेच सुरु आहे, त्यामुळे कार्यकर्ते देखील संग्रमात आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती आहे.

Mangesh Mahale

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र ठरले नसल्याने आपल्या पक्षाला जागा सुटणार की नाही म्हणून इच्छुकांची धाकधुक वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस उमेदवार उशिरा जाहीर केल्याने त्यांचा फटका महायुतीला (Mahavikas Aghadi) बसला असल्याचे बोलले जाते.

उमेदवार उशिरा जाहीर करण्याबाबत जी चूक लोकसभेला झाली, ती विधानसभेला होऊ नये, म्हणून जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकर ठरवा, असा आग्रह तीनही पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जेणेकरून काही नवीन उमेदवार जर त्या मतदारसंघात द्यायचा असेल तर त्यांना काम करण्यासाठी सोपे जाईल, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

शिवसेना, काँग्रेस, अजित पवार गटाने स्वतंत्रपणे बैठका घेऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश दिले आहेत. अनेक जागेवर तिन्ही पक्षातील नेते काम करीत आहेत.

तीनही पक्षामध्ये जागावाटपामुळे रस्सीखेच सुरु आहे, त्यामुळे कार्यकर्ते देखील संग्रमात आहेत. याबाबत रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी आहे.

ज्या ठिकाणी विद्यमान आमदार ती जागा संबधीत पक्षाला मिळणार असे यापूर्वी ठरलं असले तरी काही जागांबाबत अदलाबदल होणार आहे. काही विद्यमान जागांवर घटक पक्षातील नेत्यांनी दावा ठोकला आहे. त्यामुळे महायुतील जागा वाटपावरुन वाद होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीत तीन पक्षांमध्ये विधानसभेच्या जागा वाटपावरून जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) हे तीनही पक्ष कमी-जास्त प्रमाणात एकमेकांच्या मतदारसंघावर हक्क सांगताना दिसत आहेत. त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्यावर महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींची डोकेदुखी वाढणार आहे, हे मात्र निश्चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT