Rahul Kul, BJP Sarkarnama
पुणे

BJP Clean Chit Plan: राहुल कुलांना वाचवले ! काय आहे भाजपचा 'क्लिन चिट'चा 'प्लॅन' ?

BJP Plan And Rahul Kul News: तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात राहुल कुलांचेही नाव

उत्तम कुटे

Pune News : भाजपशी सबंधित कुणावरही आरोप झाला, तरी त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकारकडून 'क्लीन चिट' मिळत असल्याचे बोलले जात होते. हा दोषमुक्तीचा 'सिलसिला' सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारनेही पुढे चालू ठेवला आहे की काय अशी परिस्थिती आहे. दौंडमधील भाजपचे आमदार राहुल कुल यांना भीमा-पाटस साखर कारखान्यांतील कथित भ्रष्टाचारातून दोषमुक्त करण्यात आले आहे. (Latest Political News)

भीमा-पाटस कारख्यानात कोणताही घोटाळा झाला नसल्याचे राज्य विधिमंडळाच्या विधानपरिषदेतील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात गुरुवारी सरकारने स्पष्ट केले. कारखान्याच्या २०२१-२२ वर्षाच्या लेखा परीक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे त्यात म्हटले आहे. तर, इतर आर्थिक वर्षांच्या अहवालांच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून त्यातून जे समोर येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही त्यात पुढे नमूद करण्यात आले आहे.

आता 'क्लिन चिट' मिळाल्याने राहुल कुलांचा मंत्रिपदाच्या मार्गातील एक अडथळा दूर झाल्याचे बोलले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार अधिवेशन संपल्यानंतर होण्याची शक्यता आहे. यातत्यात पुणे जिल्ह्यातून कुल यांचेही नाव घेतले जात आहे. आगामी लोकसभेला त्यांना बारामतीतून उमेदवारी देण्याचा भाजपचा मानस आहे. त्याला बळ देण्यासाठी त्यांना मंत्री केले जाण्याची शक्यता आहे.

शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कुल यांच्यावर हा पाचशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. मात्र, त्यामागे वेगळेच कारण असल्याची चर्चा झाली. ‘विधिमंडळ हे चोरमंडळ आहे’ या खासदार राऊतांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात अगोदरच हक्कभंगाची नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची, यासाठी हक्कभंग समिती नेमली असून त्याचे अध्यक्ष आमदार कुल आहेत. या 'कनेक्शन'मधूनच कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT