Vidyanand Bapat assault case: Santosh Chavan, identified as a Ganesh mandal worker. sarkarnama
पुणे

Vidyanand Bapat Assault Case : विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्याची ओळख पटली; गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष, हल्ल्यामागचे कारण काय?

Santosh Chavan Police : डीजेच्या विरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आली. मारहण करणाऱ्या व्यक्तीचे ओळख पटली असून तो गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असल्याचेही समोर आले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यात गणेशोत्सवातील डीजेच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. गणेशोत्सवात डीजेचा वापर करावा की नाही, यावरून गेल्या काही दिवसांपासून विविध स्तरांत चर्चा सुरू आहे. काहींनी डीजेच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे, तर काहींनी डीजेमुक्त गणेशोत्सवाचा आग्रह धरला आहे.

या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी विद्यानंद बापट यांचे नाव आले आहे. बापट यांनी सुरुवातीपासूनच गणेशोत्सवातील डीजेच्या वापराला विरोधाची भूमिका घेतली आहे. त्यांच्या प्रतिक्रिया आणि वक्तव्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, याचदरम्यान बापट यांना मारहाण झाल्याची घटना समोर आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.

मारहाणीनंतर हल्लेखोर नेमका कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे? तो कोणत्या नेत्याचा कार्यकर्ता आहे? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, विद्यानंद बापट यांना मारहाण केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचे नाव संतोष चव्हाण असल्याचे सांगितले जात आहे. चव्हाण हा पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. तो एका बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला असल्याचेही सांगितले जात आहे.

याशिवाय संतोष चव्हाण हा राऊतवाडी येथील प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि डीजेच्या मुद्द्याशी संबंधित वादातूनच हा हल्ला झाला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता?

संतोष चव्हाण याचा कोणत्या राजकीय पक्षाशी थेट संबंध आहे किंवा तो कोणत्या नेत्याचा कार्यकर्ता आहे, याबाबत अद्याप अधिकृतपणे स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे त्याला कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून संबोधणे घाईचे ठरणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर मात्र चव्हाणच्या राजकीय संबंधांबाबत विविध दावे केले जात आहेत. या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

हल्ल्यामागे नेमकं कारण काय?

विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डीजेच्या मुद्द्यावरून झालेला वाद या घटनेमागे आहे का, की हल्ल्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

बापट काय म्हणाले?

विद्यानंद बापट म्हणाले की, मी प्रतिक्रिया देत होतो तितक्यात एक वेडा आला आणि माझ्यावर हल्ला केला कारण मी निशस्र होतो. त्याला फक्त सवंग प्रसिद्धी हवी होती मी जसं म्हणतो, 'घटम् भिन्द्यात् पटम् छिन्द्यात्'अगदी तसंच. आता पोलिसांकडे सगळे फुटेज आहे, पोलिसांनी त्याला ताब्यात घ्यावं आणि तुडवून काढावं. म्हणजे त्याला कळेल. मुद्द्याचं उत्तर मुद्द्याने द्यायचं असतं गुद्याने नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT