

Raigad Politics : रायगड जिल्ह्यात अद्याप राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील वाद शांत झालेला नाही. सध्या असेच चित्र असून, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांना लक्ष्य केलं जात असतानाच, आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील आता आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादीच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांनी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केलेल्या आंदोलनाला स्टंटबाजी असे म्हणत जोरदार टीका केली आहे.
तालुक्यातील तरुणांना टाटा स्टील आणि गोदरेजसारख्या मोठ्या उद्योगसमूहात रोजगार मिळावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी महाएल्गार आंदोलनाची हाक दिली होती. हे आंदोलन आज (ता. ३) करण्यात येणार होते. पण त्याआधीच घारे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर सायंकाळी सोडून देण्यात आले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे तातडीने खालापुरात दाखल होत हा विषय हाताळला. तसेच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत हा विषय मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही दिली. ज्यानंतर हे आंदोलन आता स्थगित करण्यात आले आहे.
आता याच आंदोलनावर कधीकाळी तटकरे यांच्याबरोबर स्टेज शेअर केलेल्या त्यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहिलेल्या थोरवे यांनी बोचरी टीका केली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर दळवींच्या पाठोपाठ आता थोरवे यांनी केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादी-शिवसेनेच्या संघर्षाला नव्याने फोडणी मिळाली आहे.
थोरवे यांनी, खालापूर येथे राष्ट्रवादीच्या पुढाकाराने गोदरेज आणि टाटा कंपनीविरोधात आंदोलनाची स्टंटबाजी असल्याचा उल्लेख केला. तसेच राष्ट्रवादीविरोधात आक्रमक पवित्रा घेत जोरदार टीका केली आहे. एकीकडे सत्तेत राहताय, सत्तेचा मलिदा खाताय आणि दुसरीकडे विकासकामांना विरोध का करता? असा सवाल थोरवे यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे हे आंदोलन कंपन्यांना टाळ ठोकणारे असून, पुढे राष्ट्रवादीने असे आंदोलन केलं तर त्याविरोधात आंदोलन केलं जाईल, असाही इशारा थोरवे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.