Vidyanand Bapat  Sarkarnama
पुणे

Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांसाठी दिल्लीतून फोन, उमेदवारी देण्यास उत्सुक असलेला पक्ष कोणता? मोठा वकील करणार मध्यस्थी

Vidyanand Bapat Asim Sarode : पदवीधर मतदारसंघातून विद्यानंद बापटने उभं राहावं, याबद्दल मला अनेकांनी फोन केले. दरम्यान, दिल्लीतून एका पक्षाचा फोन देखील आल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.

Sudesh Mitkar

Pune News : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार असणार या चर्चांना उधाण आला आहे. या सर्व चर्चांमध्ये आता डीजे बाबत आपली भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांचं नाव देखील चर्चेत आला आहे.

विद्यानंद बापट हे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार असावेत असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सुप्रीम कोर्टामध्ये भूमिका मांडणारे वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केला आहे. तसंच त्यांनी उमेदवारी स्वीकारावी यासाठी आपण मध्यस्थी करणार असल्याचे देखील असीम सरोदे यांनी सांगितला आहे.

याबाबत पुण्यात माध्यमांशी बोलताना असीम सरोदे म्हणाले, अनेक जणांचा असा समज आहे की विद्यानंद बापट हा आमच्यासोबतच आहे. खरं तर वैचारिक दृष्टिकोनातून आमची जवळीक आहे, हे नक्कीच आहे. परंतु विद्यानंदने स्वतः ही सगळी मोहीम सुरू केली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद सामान्य लोकांचा मिळाला आहे.

त्यातून एक दिसून आलं परत की विद्यानंद अत्यंत संयमित पद्धतीने, चांगल्या भाषेमध्ये, न चिडता, कोणत्याही प्रकारे आवाज न करता आणि प्रमाणिक भाषेमध्ये सयुक्तिक पद्धतीने आपली भूमिका मांडतात. आजकाल जेव्हा की राजकारणामध्ये अत्यंत असभ्य बोलणाऱ्या, बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे, अशा पार्श्वभूमीवर पदवीधर मतदारसंघातून विद्यानंद बापटने उभं राहावं याबद्दल मला अनेकांनी फोन करून सांगितलं. मी ते काही खूप गंभीरतेने घेतलं नाही, कारण लोकांच्या भावना नेहमीच असतात की चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे. विद्यानंद बापटसोबत माझं याच्याबद्दल काही बोलणं झालं नाही.

परंतु या दरम्यानच भारतातील एक ऐतिहासिक असलेला जुना पक्ष आणि दिल्लीस्थित नेते त्यांचा मला फोन आला की, विद्यानंद बापटला आपण निवडणुकीत उभं करण्यासाठी त्याच्याशी बोला आणि आम्ही सगळेजण त्याना पाठिंबा देऊ. त्यामुळे आता ही गोष्ट महत्त्वाची आहे असं मला वाटतं आहे. कारण चांगल्या लोकांनी उभं राहिलं पाहिजे ही एक लोकभावना म्हणून महत्त्वाची आहे. त्याचबरोबर एखाद्या महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील पक्षालासुद्धा वाटत असेल की विद्यानंद बापटने उभं राहावं, तर मला असं वाटतं की चांगुलपणा राजकारणातला वाढत चाललेला आहे आणि परिवर्तन करणारे लोक राजकीय लोकांना पाहिजे आहेत, ही एक महत्त्वाची घडामोडी आहे.

विद्यानंद बापटांशी चर्चा करणार

विद्यानंद बापटशी याच्याबद्दल चर्चा झालेली नाही. मात्र याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहे त्यानंतर त्याचं काय मत आहे ते लक्षात येईल. जर विद्यानंद बापटने खरोखर इच्छा दर्शवली, त्याने होकार दिला या निवडणुकीसाठी उभं राहायचा, तर अनेक जण त्यांना सपोर्ट करतील असं मला वाटतं. त्यामुळे लवकरच आम्ही या चर्चेसाठी सुरुवात करू असं असीम सरोदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT