Vidyanand Bapat: ‘डीजेविरोधी’ विद्यानंद बापट पुणे पदवीधर निवडणूक लढणार? एका पोस्टने चर्चेला उधाण

Vidyanand Bapat Pune Graduate Election 2026: बापट हे अभ्यासू, विनम्र आणि विविध सामाजिक प्रश्नांची जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व असल्याचेही असीम सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
Vidyanand Bapat
Vidyanand Bapat Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, या मतदारसंघांच्या निवडणूक कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.या पार्श्वभूमीवर सध्या चर्चेत असलेले एक नाव समोर आले आहे.

गणेशोत्सवातील डीजेच्या दणदणाटासह ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांनी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवावी का, असा थेट सवाल वकील असीम सरोदे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे उपस्थित केला आहे. त्यामुळे बापट यांच्या संभाव्य राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

पुणे विभागाच्या मतदारसंघात पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. अधिकृत निवडणूक यंत्रणेने या मतदारसंघांसाठी मतदार यादीची प्रक्रियाही पूर्ण केली आहे.

याच पार्श्वभूमीवर सामाजिक आणि कायदेशीर क्षेत्रातील व्यक्तींचीही संभाव्य उमेदवारी चर्चेत येत आहे. त्यात विद्यानंद बापट यांच्या नावाची भर पडली आहे. मात्र, बापट यांनी स्वतः निवडणूक लढवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे सध्या ही चर्चा सरोदे यांच्या सोशल मीडिया पोस्टपुरतीच असल्याचे चित्र आहे.

Vidyanand Bapat
CBSE Board Exam Marking: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! सॅम्पल पेपर, मार्किंग स्कीम जाहीर; सीबीएसईचा मोठा निर्णय

असीम सरोदे यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

अॅड. असीम सरोदे यांनी विद्यानंद बापट यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ध्वनिप्रदूषणाविरोधात बापट यांनी घेतलेल्या भूमिकेचा उल्लेख करत सरोदे यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. उत्सवांच्या बदलत्या स्वरूपावर आणि त्यातील वाढत्या ध्वनिप्रदूषणावर बापट निर्भयपणे भूमिका मांडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

बापट हे अभ्यासू, विनम्र आणि विविध सामाजिक प्रश्नांची जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व असल्याचेही सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. भाषेचा स्तर कायम ठेवून एखाद्या विषयावर भूमिका मांडण्याची त्यांची शैली असल्याचा उल्लेख करत त्यांनी, विद्यानंद बापट यांनी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवावी का? असा प्रश्न थेट उपस्थित केला.

ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून बापट चर्चेत

गणेशोत्सवातील आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये होणाऱ्या मोठ्या आवाजाच्या वापराविरोधात विद्यानंद बापट यांनी भूमिका घेतली होती. या विषयावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला असून, सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. याच सामाजिक भूमिकेमुळे त्यांचे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहे.

आता असीम सरोदे यांच्या पोस्टनंतर हीच सामाजिक ओळख राजकीय मैदानात उमेदवारीपर्यंत पोहोचणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. बापट निवडणूक लढवणार की नाही, याबाबत त्यांच्याकडून अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com