Eknath Shinde Shiv Sena 1 Sarkarnama
पुणे

Eknath Shinde Shiv Sena : ‘सुपडा साफ’चा बदला झेडपीत? पुण्यात शिवसेना किंगमेकर बनणार, आमदारांचा राजकीय डाव!

Vijay Shivtare Action Plan to Become Kingmaker After PMC Election Failure : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत किंगमेकर कसे होता येईल, याची तयारी एकनाथ शिंदे शिवसेनेने केलला असल्याचा प्लॅन आमदार विजय शिवतारे यांनी सांगितला.

Sudesh Mitkar

Pune Zilla Parishad Election : पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती होऊ शकली नाही. त्यानंतर शिंदेसेनेने स्वबळावरती तब्बल 100 हून अधिक जागा लढवल्या.

मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. त्यानंतर आता शिंदेसेनेला जिल्हा परिषदेवरती झेंडा फडकवण्याची आशा आहे. मात्र हा विजय संपादन करत असताना आपली एक हाती सत्ता आली नाहीस तरी आपण किंगमेकरच्या भूमिकेत असू, असा विश्वास शिंदेला वाटत आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे निकटवर्ती असलेल्या आमदार विजय शिवतारे यांनी याबाबतची गणितं मांडली आहेत. पुण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेच्या सूचनेनुसारच होईल. सत्तेची चावी ना अजित पवारांकडे असेल ना भाजपकडे. त्या आपल्याकडे असतील असा विश्वास विजय शिवतारे यांना वाटत आहे.

भोरमध्ये झेडपीच्या पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना (Shivsena) उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ विजय शिवतारे यांच्या हस्ते भोरमधील मोहरी इथल्या अमृतेश्वर मंदिरातून केला. यानंतर आयोजित सभेमध्ये बोलताना माजी मंत्री आमदार विजय शिवतारे हे बोलत होते.

विजय शिवतारे म्हणाले, "आम्ही प्लॅन केलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला आहे की, आपण पूर्ण ताकदीने या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरायचं आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आमचे 13 सिटिंग उमेदवार आहेत. तर अवघ्या काही मतांनी पडलेल्या 21 जागा आहेत."

त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत 25 ते 30 सिट शिवसेनेचे येणारं हे निश्चित आहे. पूर्ण पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी चंग बांधलेला आहे. आगामी काळामध्ये पुणे जिल्ह्यातील आमदारही शिवसेनेचे असतील या दृष्टिकोनातून व्यूहरचना आखली जात असल्याचे देखील शिवतारे यांनी सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT