Banners in Saswad Sarkarnama
पुणे

Vijay Shivtare News : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही विजयबापूंची माघार नाहीच! सासवडमध्ये अजितदादांच्या सभास्थळी बॅनरबाजी

Mahayuti And Ajit Pawar NCP : शिवतारेंच्या भूमिकेवर अजित पवारांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळत शुक्रवारी सायंकाळी सासवडमध्येच जाहीर सभेचे आयोजन केले.

Sunil Balasaheb Dhumal

Baramati Political News : बारामती पवारांचा सातबारा नाही. पवारांना ५० वर्षे मत दिले, आता नाही, असे म्हणत माजी मंत्री विजय शिवतारेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ज्येष्ठ नेते शरद पवारांना लक्ष्य केले. तसेच बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करत अजित पवारांचा 2019 च्या विधानसभेचा बदला घेणार असल्याचे स्पष्ट केले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शांत राहण्याच्या सूचना देऊनही शिवतारेंनी आज अजितदादांची सासवड येथे होणाऱ्या सभास्थळी आक्रमक बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे बारामतीवरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Vijay Shivtare News)

बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha) महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत होणार असे बोलले जात होते. मात्र, दोन्ही पवारांवर टीका करत आपणही अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) जाहीर केले. अजित पवारांनी 2019 मध्ये ठरवून पाडल्याचा बदला घेण्याची हीच वेळ असल्याचे ते म्हणाले. तसेच पुरंदरच्या जनतेने पवारांना 50 वर्षे मतं दिली, आता नाही, असे म्हणत सुळेंनाही लक्ष्य केले. शिवतारेंच्या भूमिकेवर अजित पवारांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळत शुक्रवारी सायंकाळी सासवडमध्येच जाहीर सभेचे आयोजन केले. या सभेच्या ठिकाणी शिवतारेंच्या वतीने केलेली आक्रमक बॅनरबाजी लक्ष वेधून घेत आहे.

'बाप्पूंना आपलं एक मत, पवारांना संपवण्याचा दुर्मीळ योग', असे म्हणत 'विजय शिवतारे फिक्स खासदार' या आशयाची बॅनरबाजी सभास्थळासह संपूर्ण सासवड शहरात करण्यात आलेली आहे. दरम्यान, बारामती लोकसभा निवडणुकीवरून शिवतारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) ठाण्यात जाऊन भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी दोन दिवसांनंतर पुन्हा चर्चा करू, तोपर्यंत शांत राहण्याच्या सूचना केल्याची माहिती त्यांनीच दिली होती. असे असूनही अजित पवारांच्या सभेच्या मुहूर्तावरच बापूंनी केलेली बॅनरबाजी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेत आहे.

विजय शिवतारेंच्या बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे महायुतीतील अजित पवार (Ajit Pawar) गट आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादीचे ठाण्यातील नेते, प्रवक्ते आनंद परांजपे यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंनाच इशारा दिला. विजय शिवतारेंची भूमिका कायम राहिली तर तुम्हाला ठाण्यातील निवडणूक जड जाईल, असे परांजपे म्हणाले. परिणामी निवडणुकीपूर्वीच महायुतीत वाकयुद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी गुरुवारी भेटीला आलेल्या शिवतारेंना तब्बल सहा तास ताटकळत ठेवले. त्यामुळे शिवतारे आपली भूमिका कायम ठेवणार का, याबाबत चर्चा होती. त्यानंतरही शिवतारेंनी पवारांविरोधात बॅनरबाजी करून पुढचे पाऊल टाकल्याने सभेत अजित पवार काय बोलणार, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT