Mahadev Jankar News : माढा की परभणी अन् महायुती की आघाडी? महादेव जानकरांचे इरादे स्पष्ट!

Mahayuti Vs Mahavikas Aghadi : महाविकास आघाडी परभणीची, तर महायुती माढ्याची जागा देत नाही. त्यांनी त्यांचा तेथील उमेदवार दिलेला आहे.
Mhadev Jankar
Mhadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकरांचे महायुती की महाविकास आघाडी असे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवारांनी माढ्याची ऑफरही दिली होती. त्यामुळे जानकर भाजपची साथ सोडणार का, याकडे लक्ष लागले होते. त्यांनी आपली ना महायुती ना महाविकास आघाडीशी अधिकृतपणे चर्चा झाली. मी परभणी आणि माढा या दोन्ही मतदारसंघांतून निवडणूक लढवणार असल्याचे इरादे जानकरांनी स्पष्ट केले आहेत. Mahadev Jankar News

मुंबईतील वायबी सेंटर येथे महादेव जानकर (Mahadev Jankar) आणि शरद पवारांची भेट झाल्याची चर्चा होती. त्यांच्यात निवडणुकीबाबत काही खल झाली का, यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. जानकरांनी मात्र आमची भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले. जानकर म्हणाले, माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत. मात्र, त्यांची आणि माझी भेट झालेली नाही. मी दुसऱ्या मजल्यावर होतो, तर पवारसाहेब पाचव्या मजल्यावर होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mhadev Jankar
Beed Lok Sabha election 2024: पंकजा मुंडे यांच्यासमोर नवं आव्हान; यशवंत सेनेनं दंड थोपटले...

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाविकास आघाडी की महायुती, कोणत्या बाजूने लढणार, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर जानकर म्हणाले, आम्हाला महायुती आणि महाविकास आघाडी असे कुणाचेही अधिकृतपणे निमंत्रण नाही. दोन्ही पातळीवर चर्चा सुरू आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी परभणीची, तर महायुती माढ्याची जागा देत नाही. त्यांनी त्यांचा तेथील उमेदवार दिलेला आहे. परभणी आणि माढा येथून उमेदवारी अर्ज भरणार आहे. दरम्यान, माढ्याबाबत पवारांनी (Sharad Pawar) मला विचारणा केलेली आहे.

राष्ट्रीय समाज पक्ष (RSP) हा देशातील सर्व समाजासाठी आहेत. कुठल्याही एका समाजासाठी आमचा पक्ष काम करत नाही. त्यामुळे मी दोन्ही मतदारसंघांतून निवडणूक लढणार असल्याचे जानकरांनी स्पष्ट केले. परभणी आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत ओबीसींची संख्या जास्त आहे. जानकरांमागे ओबीसी समाज असल्याचे बोलले जाते. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जानकरांनी अर्ज भरला तर आघाडी आणि महायुतीतच्या उमेदवारांना संबंधित ठिकाणी फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Mhadev Jankar
Sanjay Raut News : पुण्यासाठी इच्छुक असलेल्या वसंत मोरेंनी पवारांनंतर घेतली संजय राऊतांची भेट; पण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com