Vijay Shivtare Vs Ajit Pawar Sarkanama
पुणे

Vijay Shivtare Vs Ajit Pawar : 'अनेकांना डसला अन् महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला'; शिवतारेंची अजितदादांवर जहरी टीका!

Lok Sabha Election 2024 : माझ्या जीवाशी सुद्धा काही खेळ होऊ शकतो. अनेक उदाहणं अशी झाली आहेत.

Chetan Zadpe

Pune : विंचू अनेकांना डसला आणि आता महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला, अशा शब्दात शिवसेना नेते न माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. माझ्या जीवाशीही खेळ होऊ शकतो, असेही शिवतारे यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे शिवतारे आणि अजित पवार हा संघर्ष संपताना दिसत नाही. (Latest Marathi News)

विजय शिवतारे अजित पवारांवर टीका करताना म्हणाले, "हा दादा विंचू अनेकांना डसला आहे आणि आता महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला आहे. मोदींच्या मांडीवर जाऊन बसला आहे. अडचण अशी आहे की चप्पल मारावी तर महादेवाला ही लागते आणि विंचवालाही मारता नाही, ही भावना लोकांची आहे. आणि विंचूरुपी फक्त अजित पवार नव्हे, तर दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करायचं आहे, असं माझं मत आहे," अशा शब्दात त्यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवतार पुढे म्हणाले, "माझ्या जीवाशी सुद्धा काही खेळ होऊ शकतो. अनेक उदाहणं अशी झाली आहेत. सोलापूरला सिद्राम म्हेत्रे यांच्या प्रकरणात गोळीबार झाला होता. मलाही भिती आहे. काही मोठे गुंडसुद्धा मला गोड पद्धतीने धमकी देतात. योग्य वेळेस याची माहिती मी देईल, असे शिवतारे म्हणाले.

तिरंगी लढत -

बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी आपली ठाम भूमिका जाहीर केली आहे. "मी बारामती मतदारसंघातून विचारपूर्वक निवडणूक रिंगणात उतरलो आहे, असे शिवतारे म्हणाले. यामुळे बारामतीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या लढाईत आता विजय शिवतारे बारामतीच्या मैदानात आले आहेत.

येत्या काळात कुठलाही दबाव माझ्यावर आणला तर मी लोकसभा निवडणूक रिंगणातून माघार घेणार नाही, असे सांगत 12 एप्रिलला 12 वाजता आपण लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार असल्याचे शिवतारेंनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT