Baramti Loksabha News : बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या निर्णयावर माजी मंत्री विजय शिवतारे ठाम आहेत. त्यांनी बैठकीत अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले. निवडणुकीसाठी एक एप्रिलला प्रचाराला सुरुवात करणार असल्याचे सांगत त्यांनी रणशिंग फुंकले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) आणि सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांच्यात लढत होणार असल्याचं निश्चित झालं आहे. या लढतीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पण, शिवसेना नेते, माजी आमदार विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) यांच्या एन्ट्रीनं निवडणुकीत ट्विस्ट आला आहे. (Vijay shivtare News)
शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांना लक्ष्य करत असून, बारामतीतून निवडणूक लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अशातच आता शिवतारेंनी केलेल्या नव्या विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या निर्णयावर माजी मंत्री विजय शिवतारे ठाम आहेत. त्यांनी रविवारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर त्यांनी अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले. त्यामुळे आता बारामती मतदारसंघातील निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एक एप्रिलला पुरंदरच्या पालखीतळावर या लढाईचा बिगुल वाजवायचा आहे. त्यासाठी सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. पुरंदरमधील सर्वपक्षीय नेत्यांना एक एप्रिलच्या बैठकीला निमंत्रण देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच १२ एप्रिलला १२ वाजता बारामती लोकसभा निवडणुकीसाठी फॉर्म भरणार असल्याचे सांगत, विजय शिवतारे यांनी रणशिंग फुंकले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री विजय शिवतारे यांची इंदापुरात शनिवारी भेट झाली. महायुतीचा धर्म पाळावा, आपण महायुतीच्या उमेदवाराला मदत करावी, अशी विनंती भरणें यांनी शिवतारे यांना केली. अपक्ष उभे न राहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळावा, अशी विनंती करत हस्तांदोलन केले होते.