Vijay Shivtare
Vijay Shivtare  Sarkarnama
पुणे

Vijay Shivtare : विजय शिवतारे अॅक्शन मोडवर; ‘महिंद्रा’ प्रकल्पासाठी थेट नागपूरात मुख्यमंत्र्यांना साकडे

सरकारनामा ब्यूरो

Vijay Shivtare News : महिंद्रा कंपनीच्या प्रकल्पासाठी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी मंगळवारी थेट नागपुर गाठले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेत शिवतारे यांनी हा प्रकल्प पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागात खेचण्यासाठी जोर लावला आहे.

यासंबंधी बोलतांना शिवतारे म्हणाले, 'महिंद्रा उद्योग समुह त्यांच्या स्वतंत्र इलेक्ट्रिक वाहन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. मागील काही दिवसापासून पेट्रोल, डिझेल सीएनजीच्या गाड्या वापरण्यापेक्षा लोक आता इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील काळात या उद्योगाला चांगले भविष्य आहे. हा प्रकल्प दक्षिण भागात विकसीत झाल्यास मोठ्याप्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होणार आहे. याचा फायदा आजूबाजूच्या गावांमधील तरुणांना होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुरंदर, दौंड, किंवा भोर या एमआयडीसीमध्ये व्हावा यासाठी मी प्रयत्नशील आहे.”

जवळपास 10 हजार कोटींची गुंतवणूक महिंद्रा या प्रकल्पासाठी करणार आहे. पुण्याच्या बाजूला असणाऱ्या चाकण, हिंजवडी, तळवडे, भोसरी, खराडी अशा औद्योगिक वसाहतींमुळे या भागात रोजगार निर्मीतीच्या संधी निर्माण झाल्या. परंतू दक्षिण भागात त्या तुलनेत रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे पुण्याच्या दक्षिण भागातील एमआयडीसींमध्ये हा प्रकल्प झाल्यास आजूबाजूच्या बारामती, इंदापूर, वेल्हे, पुरंदर, हवेली, दौंड, किंवा भोर या तालुक्यांना लोकांना त्याचा लाभ होणार आहे. म्हणून हा प्रकल्प आपल्या भागात व्हावा असा माझा प्रयत्न आहे, यात मला नक्की यश मिळेल, अशा विश्वास शिवतारे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून मी त्यासाठी भविष्यात देखील पाठपुरावा करणार असल्याची माहिती शिवतारे यांनी दिली.

महिद्रा प्रकल्पाची वैशिष्टे:

·      १० हजार कोटींची गुंतवणूक

·      मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी होणार उपलब्ध

·      प्रकल्पासाठी लागणारी हजारो एकर जमिनीची आवश्यकता

·      ईलेक्ट्रिक गाड्यांची होणार निर्मीती

·      चाकण, भोसरी ऑटोहब प्रमाणे पुण्यातील दक्षिण भागातसुध्दा ईव्हीहब

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT