Vijay Wadettiwar Meets Kaspate Family: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केलेले राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेत 16 मे रोजी आत्महत्या केली. या प्रकरणात वैष्णवीचे पती शशांक, सासरा राजेंद्र, सासू लता, नणंद करिष्मा, दीर सुशील यांना अटक केले आहे. वैष्णवीच्या पोस्टमार्टमध्ये तिच्या शरीरावर मारहाणीच्या खूणा अडळल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
कस्पटे कुटुंबीयांच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत वैष्णवीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दाव केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'वैष्णवीच्या शरीरावर आढळलेल्या जखमांवरून हे स्पष्ट होते की ही आत्महत्या नसून सरळसरळ हत्या आहे. इतकी गंभीर घटना घडून सुद्धा पोलीस कारवाई संथ गतीने सुरू आहे, हे अत्यंत दुःखद आहे.'
कस्पटे कुटुंबीयांसोबत झालेल्या भेटीविषयी सांगताना वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पैशासाठी होणाऱ्या सासरच्या छळामुळे आत्महत्या केलेल्या स्व. वैष्णवी हगवणे हिचे आई- वडील आणि कस्पटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. वैष्णवीच्या आई वडिलांच्या वेदना आज शब्दांत मांडता येण्यासारख्या नाहीत.
वैष्णवीच्या प्रकरणात राज्य महिला आयोगाने स्वतःहून कारवाईस पुढाकार न घेणे हे महाराष्ट्रासाठी खरोखर लज्जास्पद आहे.सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष देऊन वैष्णवी, तिच्या 9 महिन्याच्या बाळाला आणि कस्पटे कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली.
वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. आरोपी सासरा राजेंद्र हगवणे याला 28 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाविषयी माध्यमांशी बोलातना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकरणात आरोपींवर कठोरता कठोर कारवाई केली जाईल. तसेच नियमांचा आधार घेत शक्य असेल तर त्यांना मकोका देखील लावण्यत येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.