Jarange Patil Vs Devendra Fadnavis : 'देवेंद्र फडणवीसांना ही शेवटची संधी अन्यथा...', मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 'चलो मुंबई'चा नारा...

Maratha Reservation Manoj Jarange Patil : मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळांच्या आडून करत आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
Maratha activist Manoj Jarange Patil issues strong ultimatum to Maharashtra CM Devendra Fadnavis over pending reservation demand.
Maratha activist Manoj Jarange Patil issues strong ultimatum to Maharashtra CM Devendra Fadnavis over pending reservation demand.Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. 29 ऑगस्टला ते मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात गोदाकाठची 123 गावं सहभागी होणार आहेत. त्या गावांच्या ग्रामस्थांची बैठक अंबड तालुक्यातील ‎‎महाकाळा येथे रविवारी झाली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला.

जरांगे पाटील म्हणाले, 'मराठा आरक्षण देण्यासाठी ही शेवटची संधी देतोय. एक दिवस मिळून असे मागे लागतील देवेंद्र फडणीसला घर राहणार नाही. सुधरभाऊ आम्ही तुला सुधरायला संधी देतोय. मराठ्यांना आरक्षण द्या नाहीतर भयानगर परिणाम घडवून आणू.'

मनोज जरांगे म्हणाले, मुंबईला जाण्याची तयारी आत्तापासून करा. आरक्षण आपल्या हक्काचे आहे ते सोडू नका. आरक्षण हे अमृत आहे. गाफील राहू नका, आम्ही कोणाच्या बापाचे आरक्षण मागत नाही. आरक्षण देण्याची सरकारला ही शेवटची संधी आहे. अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल.

Maratha activist Manoj Jarange Patil issues strong ultimatum to Maharashtra CM Devendra Fadnavis over pending reservation demand.
Shashi Tharoor Politics : तुम्ही मोदी सरकारसाठी काम करता का? शशी थरुरांनी दिले स्मार्ट उत्तर

भुजबळ-फडणवीसांना फिरू देणार नाही

मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळांच्या आडून करत आहे. ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याची व्हॅलिडिटी देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांना सांगून त्यामध्ये त्रुटी काढल्या जात आहेत. जर मराठा आरक्षणाला विरोध कराल तर देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

समाजाशी गद्दारी करणार नाही

आमचा लढा हा गोरगरीब मराठ्यांसाठी आहे. मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. माझ्या विरोधात बदनामीचा कट रचला जातोय तरी मी शांत बसणार नाही. मी एकही वाईट काम केले नाही त्यामुळे मी घाबरणार नाही. जीव गेला तरी चालेल पण समाजाशी गद्दारी करणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Maratha activist Manoj Jarange Patil issues strong ultimatum to Maharashtra CM Devendra Fadnavis over pending reservation demand.
Maharashtra Politics: झेडपी, पंचायत समिती अन् ग्रामपंचायत! ही त्रिस्तरीय व्यवस्था आहे महाराष्ट्राच्या आजच्या ताकदीचे मुळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com