Voter List 
पुणे

Vote Chori : व्होट चोरीचा 'पुणे पॅटर्न', महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून आखला जातोय विजयाचा फाॅर्म्युला?

Pune Pattern Vote Chori : आपल्या विरोधातील असणाऱ्या मतदारांना प्रभागातून दुसऱ्या प्रभागात टाकण्याचा व्होटी चोरीचा वेगळाच पॅटर्न पुण्यामध्ये उघडकीस आला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेत्यांनी व्होट चोरीचा मुद्दा उचलून धरला असून त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विविध प्रात्यक्षिकाद्वारे व्होट चोरी कशा पद्धतीने घडून आणली जात आहे. हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

एक नोव्हेंबरला याच मुद्द्यावर एकत्र येत महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षांनी मुंबईमध्ये मोठा मोर्चा देखील काढला. एकीकडे राज्यभर हा व्होट चोरीचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे पुण्यामध्ये मात्र वेगळाच व्होट चोरीचा 'पुणे पॅटर्न' शिजत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील काही नेत्यांचा सहभाग असल्याच सांगितलं जात आहे. प्रभाग रचना अंतिम झाल्याने प्रशासनाकडून प्रभाग निहाय मतदारयाद्या अंतिम करण्याचे काम सुरू आहे. यासाठी महापालिकेने अधिकाऱ्यांची देखील नेमणूक केली आहे. यातीलच काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्होट चोरीचा प्लॅन आखला गेल्याचा आरोप करण्यात येत आहे.

प्रभागातील आपल्याला प्रतिकूल असलेल्या मतदारांचा गठ्ठा उचलून त्यांना शेजारच्या प्रभागातील मतदारयादी मध्ये टाकायचे आणि आजूबाजूच्या प्रभागातील आपल्याला अनुकूल असलेले मतदार आपल्या प्रभागाच्या मतदारयादी मध्ये घेण्याचा प्रकार अधिकाऱ्यांना हाताशी धरून करण्यात आल्याचा हा 'व्होटी चोरी'चा पुणे पॅटर्न राबण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे.

आर्थिक देवाण घेवाण?

व्होट चोरीचा हा पुणे पॅट्न आपल्या विरोधात पडणारी मतं ही प्रभागातील रहिवासी असून देखील दुसऱ्या प्रभागात ढकलण्याचा कारभार आहे. या मतदारयाद्या निर्मितीसाठी आर्थिक देवाण-घेवाण देखील झाल्याचं बोललं जात आहे.या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील करण्यात आली आहे.

मिळालेल्या तक्रारीनुसार काही इच्छुकांनी महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सीमावर्ती भागातील मतदारांची नावे आपल्या प्रभागात हलवली आहेत. परिणामी काही प्रभागांतील मतदारसंख्या १.२५ ते १.५० लाखांपर्यंत फुगली, तर इतर ठिकाणी ती ६५ हजारांवर घसरली आहे.

निवडणूक आयोगाकडून क्राॅस चेकींग

निवडणूक आयोगाकडे तक्रारी पोहोचल्यानंतर आता आयोगाने या मतदार याद्यांचं क्रॉस चेकिंगचे काम हाती घेतले आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भात नुकतेच आदेश काढल्या असून ते काम सहाय्यक आयुक्तांकडे सोपवण्यात आले आहे. हे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या तपासासाठी 28 अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली असून मतदारयादी पदनिर्देशित अधिकारी रवी पवार यांनी त्यांची यादी जाहीर केली आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT