

Jalgaon News, 02 Nov : 'महायुतीच्या एक वर्षाच्या काळात आमदारांना एक फुटकी कवडीही मिळाली नाही, शिवसेनेच्या पाचही आमदारांनी ठरवलं, तर जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच अध्यक्ष बसणार.
भाजप नेते युतीबद्दल बोलतात पण ते कधी पलटतील, याचा भरोसा नाही,' असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. पाचोरा येथील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलताना आमदार पाटील यांनी भाजप नेत्यांच्या भूमिकेवर टीका केली.
ते म्हणाले, भाजपमध्ये बंडखोरी करणाऱ्यांची पाच वर्षांसाठी हकालपट्टी केली जाईल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. मात्र विधानसभेला माझ्या मतदारसंघात बंडखोरी झाली. त्यावेळे मी त्यांना फोन केले पण त्यांनी उचलले नाहीत. शिवाय बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई सोडाच पण त्यांना पदाच्या रूपाने तुम्ही शाबासकी देण्यात आली, असं म्हणत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
तर यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री झाले नाही हे दुर्दैव असल्याची खंत देखील व्यक्त केली. ते म्हणाले, 'लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांचे मानधन एकनाथ शिंदेंनी सुरू केलं. त्यांनी सांगितलं होतं मी जर पुन्हा मुख्यमंत्री झालो तर दीड हजाराचे 2100 रुपये करणार. पण ते पुन्हा मुख्यमंत्री झाले नाही हे दुर्दैव आहे.'
शिवाय महायुतीच्या एक वर्षाच्या काळात एक फुटकी कवडीसुद्धा आमदारांना मिळाली नसल्याची उघड नाराजी त्यांनी बोलून दाखवली. शिवाय आम्हाला फक्त पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा सहारा आहे. अतिवृष्टीमुळे माझ्या मतदारसंघातील विकासाची भर वर्षभरात काढू शकत नसल्यामुळे पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन पाच टक्के निधीमधून किमान 50 टक्के निधी मतदारसंघासाठी द्यावा अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी एक रुपयात पिक विमा ही योजना राबवली होती ती आता चालू राहिली असती तर शेतकऱ्यांना शासनाकडे हात पसरण्याची वेळ आली नसती, असं म्हणत फडणवीस सरकारवर निशाणा साधला. तर पाटील यांनी यावेळी बच्चू कडूंचं अभिनंदन केलं. ते म्हणाले बच्चू कडू यांनी राज्यातील तमाम शेतकऱ्यांचे कर्जमाफी व्हावी यासाठी आंदोलन केलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.
तर आता पाटील यांच्या या वक्तव्यांमुळे शिंदेंच्या आमदारांच्या मनातील खदखद बाहेर आल्याचं दिसत आहे. शिवाय ऐन स्थानिकच्या निवडणुकीपूर्वी आमदार पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीतील धुसफूस बाहेर आल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता पाटील यांच्या वक्तव्यावर भाजप काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.