Kasaba By-Election  Sarkarnama
पुणे

Kasaba By-Election : उद्या मतदान, दोन लाखाहून अधिक मतदार, वाचा अशी आहे प्रशासनाची तयारी..

कसबा आणि चिंचवडसाठी उद्या मतदान होणार असून ३ मार्च ला मतमोजणी होणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Kasaba By-Election : कसबा विधानसभा पोटनिवडणुकासीठी सुरु असलेल्या प्रचारसभा संपल्या. कसबा आणि चिंचवडसाठी उद्या मतदान होणार असून ३ मार्च ला मतमोजणी होणार आहे. कसब्यात भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होणार आहे. या निवडणुकीत एकूण २७० मतदान केंद्रांवर कसबा मतदार संघातून दोन लाख ७५ हजार ४२८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

निवडणुकीसाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. रविवारी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदार प्रक्रिया पार पडणार आहे. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडूनही संपूर्ण तयारी झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक ते मनुष्यबळ, पोलीस बंदोबस्त, संवेदनशील मतदान केंद्रावर चित्रीकरण, भरारी पथके आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती अशी चोख तयारी करण्यात आली आहे.

या मतदानासाठी जवळपास बाराशे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंदीर येथे आज (२५ फेब्रुवारी) पुन्हा एकदा शेवटचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रांचे (EVM) वाटप केले जाईल. त्यानंतर उद्या सकाळीच सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहचतील. कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहचवण्यासाठी ४३ मोठ्या, सात छोट्या आणि १२ जीप पुरवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मतदान केंद्रांवर शरीर तपासणी यंत्रणा ठेवण्यात आल्या आहेत.

मतदार यादीत नाव कसे शोधाल?

मतदार यादी नाव शोधण्यासाठी VOter Helpline App

दिव्यांगांसाठी Pwd App यासोबतच www.ceo. maharashtra.gov.in

आणि http://electoralseasech.in या संकेतस्थळांना भेट द्या.

कसबा मतदार संघाचा एक आढावा

एकुण मतदार २,७५,४२८

पुरुष मतदार -१३६८७३

महिला मतदार -१३८ ५५०

तृतीयपंथी मतदार- ०५

अनिवासी भारतीय मतदार- ११४

दिव्यांग मतदार- ६५७०

एकूण मतदान केंद्रे- २७०

संवेदनशील मतदान केंद्र- ०९

चित्रीकरण करण्यात येणारी मतदान केंद्र- २७

मतदानासाठी तैनात कऱण्यात आलेले कर्मचारी- १२००

क्षेत्रीय अधिकारी- २५

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT