सोलापूर : माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्याशी पंगा घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी नुकतीच तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांची सोलापुरात (Solapur) पोलिस आयुक्तालय कार्यालयात जाऊन भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे. भेटीचा तपशील कळू शकला नसला तरी या दोघांच्या भेटीची चर्चा मोहोळ मतदारसंघात चवीने चर्चिली जात आहे. (Umesh Patil meet ncp's former Mla Ramesh Kadam)
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी आमदार रमेश कदम हे सध्या तुरूंगात आहेत. त्यांना परवा सोलापुरात आणण्यात आले आहे. रमेश कदम हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोहोळमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, अवघ्या वर्षभरातच त्यांना अटक झाली होती. मोहोळचे माजी आमदार असलेल्या कदम यांची उमेश पाटील यांनी सोलापुरात कमशिनर कार्यालयात जाऊन भेट घेणे महत्वाचे मानले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्याशी उमेश पाटील यांनी तालुक्यात उभा दावा मांडला आहे. पाटील आणि कुटुंबीयांवर ते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हल्ला करत आहेत. मात्र, तुरुंगात असलेले कदम यांची पाटील हे आवर्जून भेट घेत आहेत, याचे राजकीय इंगित काय, असा सवालही मोहोळ मतदारसंघात विचारला जात आहे.
सोलापुरात पोलिस आयुक्तालयात पाटील हे कदम यांना जाऊन भेटले. त्या ठिकाणी या दोघांमध्ये एक तासभर चर्चा झाली. त्यांच्या भेटीमुळे मोहोळच्या राजकारणात काय उलटफेर होतो का हे पाहावे लागेल. या दोघांमधील चर्चेचा तपशील मात्र समजू शकलेला नाही.
माजी आमदार रमेश कदम हे दोषी आहेत की नाहीत, हे न्यायालय ठरवेल. मात्र, त्यांच्या असलेल्या दोषारोपांपेक्षाही जादा शिक्षा त्यांनी भोगली आहे. ते माझ्या पक्षाचे माजी आमदारही आहेत. तसेच, माझे चांगले मित्रही आहेत, त्यामुळे मी त्यांची सोलापुरात जाऊन भेट घेतली. तसेच त्यांची विचारपूसही केली. खरे तर अनेकजण लेकीबाळीच्या चारित्र्याशी दुर्व्यवहार करून अनेकजण खुलेआम फिरत आहेत. न्यायदेवता माजी आमदार रमेश कदम यांना नक्कीच न्याय देईल, असा विश्वासही उमेश पाटील यांनी या भेटीनंतर व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.