Election Commission
Election Commission  Sarkarnama
पुणे

तयारीला लागा : ZP आणि पंचायत समितींचे मतदारसंघ जाहीर

गजेंद्र बडे

पुणे : पुणे जिल्हा परिषद (Pune ZP election) आणि पंचायत समित्यांच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी नव्याने गट निश्‍चितीसाठी राज्य निवडणूक आयोगाने (State election commission) दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेसाठी ८२ तर, पंचायत समित्यांसाठी एकूण १६४ गण निश्‍चित केले आहेत.

यामुळे जिल्हा परिषदेचे नवीन सात गट आणि पंचायत समित्यांचे नवीन १४ गण वाढले आहेत. हवेली तालुक्यातील २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याचा मोठा फटका या तालुक्याला बसला आहे. हवेली तालुक्यातील तब्बल सात गट आणि १४ गणांवर संक्रांत आली आहे. नवीन रचनेत हवेली तालुक्यात आता केवळ सहा गट आणि १२ गण निश्‍चित झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील नवीन गट रचनेत आंबेगाव आणि वेल्हे या दोन तालुक्यातील पूर्वीचेच गट आणि गणांची संख्या कायम राहिली आहे. या नव्या गट रचनेचा १० तालुक्यांना फायदा झाला आहे. फायदा झालेल्या दहापैकी जुन्नर, खेड, दौंड आणि इंदापूर या चार तालुक्यात प्रत्येकी दोन गट आणि प्रत्येकी चार गण वाढले आहेत.

जिल्ह्यातील शिरूर, मावळ, मुळशी, पुरंदर, भोर आणि बारामती या सहा तालुक्यात प्रत्येकी एक गट आणि प्रत्येकी दोन गण नव्याने निर्माण झाले आहेत. जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याने, पुणे जिल्ह्यातील गट आणि गणांची संख्या कमी होणार असल्याचे निश्‍चित झाले होते. यानुसार जुन्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या ७५ गटांची संख्या २ ने कमी होऊन तीन ७३ तर, गणांची संख्या १४६ झाली होती.

दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या गट आणि गणांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. या नव्या रचनेत गट आणि गणांची संख्या वाढविण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यामुळे या नव्या रचनेनुसार पूर्वी पुणे जिल्ह्यात ८३ गट आणि १६६ गण निश्‍चित करण्यात आले होते. परंतु ही संख्या अंतिम करताना त्यात परत अनुक्रमे एक गट आणि दोन गणांनी संख्या कमी झाली आहे.

हवेलीची मोठ्या तालुक्यातील ओळख संपुष्टात

दरम्यान, आतापर्यंत हवेली तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक गट आणि गणांची संख्या राहत असे. यानुसार २०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत हवेली तालुक्यात दहा गट आणि २० गण होते. त्यानंतर पाच वर्षांनी झालेल्या २०१७ च्या निवडणुकीत हीच संख्या अनुक्रमे १३ आणि २६ झाली होती. परंतु आता यात अनुक्रमे सात आणि १४ ने घट झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक मोठा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हवेलीची ओळख संपुष्टात आली आहे. वेल्हे तालुक्याने मात्र सर्वात लहान तालुक्याची असलेली ओळख कायम राखली आहे.

नव्या रचनेनुसार नवीन गट, गणांची संख्या

तालुका --- गट --- गण

जुन्नर --- ०९ --- १८

आंबेगाव --- ०५ --- १०

शिरूर --- ०८ --- १६

खेड --- ०९ --- १८

मावळ --- ०६--- १२

मुळशी ---०४---०८

हवेली --- ०६ ---१२

दौंड --- ०८ --- १६

पुरंदर --- ०५ --- १०

वेल्हे --- ०२---०४

भोर --- ०४ ---०८

बारामती --- ०७ --- १४

इंदापूर --- ०९ --- १८

एकूण --- ८२ --- १६४

पूर्व हवेलीतील जिल्हा परिषद गट व हवेली पंचायत समिती गणांची नावे जाहीर :-

लोणी काळभोर, ता. ०२ : पुणे जिल्हा परिषद व १३ पंचायत समितींची जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय गावांची नावे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहेत पूर्व हवेलीतील जिल्हा परिषद गट व हवेली पंचायत समिती गणांची नावे पुढीलप्रमाणे :

१) वाडेबोल्हाई -कोरेगाव मूळ गट क्र. ४३ - डोंगरगाव, बुर्केगाव, वाडेबोल्हाई, शिरसवाडी, अष्टापूर, पिंपरी सांडस, न्हावी सांडस, हिंगणगाव, बिवरी, शिंदेवाडी, भवरापूर, कोरेगाव मूळ, पेठ, नायगाव, प्रयागधाम, खामगावटेक, टिळेकरवाडी.

२) उरुळी कांचन - सोरतापवाडी गट व त्याअंतर्गत गावे - उरुळी कांचन, उरुळी कांचन वार्ड क्र -२ ते ६, शिंदवणे, वळती, तरडे, सोरतापवाडी,

३) कदमवाकवस्ती - थेऊर - गट व त्याअंतर्गत गावे - कदमवाकवस्ती, मांजरी खुर्द, कोलवडी, साष्टे, थेऊर,

४) लोणी काळभोर - कुंजीरवाडी - गट व त्याअंतर्गत गावे - लोणी काळभोर, लोणी काळभोर वार्ड १ ते ६, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची

पंचायत समिती गणनिहाय गावांची नावे पुढीलप्रमाणे :

१) वाडेबोल्हाई गण त्याअंतर्गत गावे -: डोंगरगाव, बुर्केगांव, वाडेबोल्हाई, गावडेवाडी, मुरकुटेनगर, शिरसवाडी, अष्टापुर, पिंपरी सांडस, न्हावी सांडस, सांगवी सांडस

२) कोरेगाव मूळ गण व त्याअंतर्गत गावे - हिंगणगाव, बिवरी, शिंदेवाडी, भवरापुर, कोरगांव मुळ, पेठ, नायगाव, प्रयागधाम, खामगांवटेक, टिळेकरवाडी.

३) उरुळी कांचन गण व त्याअंतर्गत गावे - उरुळीकांचन वार्ड क २ ते ६

४) सोरतापवाडी गण व त्याअंतर्गत गावे - उरुळी कांचन वार्ड क्र. १, शिंदवणे, वळती, तरडे , सोरतापवाडी

५) कदमवाकवस्ती गण व त्याअंतर्गत गावे -कदमवाकवस्ती

६) थेऊर गण व त्याअंतर्गत गावे - मांजरी खुर्द, कोलवडी, साष्टे, थेऊर

७) लोणीकाळभोर गण व त्याअंतर्गत गावे - वडकी, लोणी काळभोर वार्ड क्र. १ ते ४

८) कुंजीरवाडी- गण व त्याअंतर्गत गावे - लोणीकाळभोर वार्ड क्रमांक ५, व ६, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT