राज्यसभा निवडणूक : महाडिकांचे आस्ते कदम.. भाजपच्या गळाला आणखी तीन आमदार!

राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरस
Dhananjay Mahadik
Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) या दोन्ही पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. महाराष्ट्रातून निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे. (Rajya Sabha election 2022)

या निवडणुकीसाठी पहिल्या पसंतीच्या क्रमाची 42 मते विजयासाठी आवश्यक आहेत. भाजपची अधिकृत अशी 106 मते आहेत. विजयी मतांच्या कोट्यानुसार भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. भाजपकडे जादा 22 मते शिल्लक राहतात. या मतांच्या आधारावर भाजपने धनंजय महाडिक यांना तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे. भाजपला राजेंद्र राऊत, प्रकाश आवाडे, रवी राणा याशिवाय रासपचे रत्नाकर गुट्टे, जनसुराज्यचे विनय कोरे, गोंदियाचे विनोद अगरवाल, उरणचे महेश बालदी अशा सात आमदारांनी पाठिंबा दिला आहे. यात आणखी तीन मतांची भर पडल्याचे आता दिसून येत आहे. भाजपकडे 32 जादा मते आता तयार असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

Dhananjay Mahadik
राज्यसभा निवडणुकीबाबत अजितदादांचं सूचक विधान : 'अर्ज सहा की सात, यावर चर्चा सुरू आहे!'

मुंबईत पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी भाजपचे पारडे या निवडणुकीत जड असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, भाजपाचे तीन राज्यसभा सदस्य निवृत्त होत असल्याने पक्षाने तीन उमेदवार निवडणुकीस उभे केले आहेत. भाजपाच्या संख्याबळानुसार दोन उमेदवार सहज निवडून येतात व त्याखेरीज तिसऱ्या उमेदवारासाठी आमच्याकडे पहिल्या पसंतीची ३२ जादा मते आहेत. त्यामुळे या जागेसाठी आमचाच दावा आहे. महाविकास आघाडीकडे किती जास्त मते आहेत, हे त्यांनी सांगावे. या निवडणुकीत मतदारांनी पक्षाच्या प्रतिनिधीला मत दाखवायचे असले तरी व्हिप पाळला नाही म्हणून आमदारकी रद्द करता येत नाही. अपक्षांनी तर त्यांचे मत कोणालाही दाखवायचे नाही. अशा स्थितीत आमदारांनी सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे. महाविकास आघाडीनेही वस्तुस्थिती मान्य करावी आणि अनावश्यक तणाव दूर करावा, असे आमचे आवाहन आहे.

Dhananjay Mahadik
राज्यसभा निवडणूक : विदर्भातून जाणार उमेदवारांच्या विजयाचा मार्ग...

राज्य विधानसभेचे सध्याचे बलाबल काय सांगते?

महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. यात शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस ४४, बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २, प्रहार 2, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, शेकाप १, अपक्ष ८ अशा आमदारांचा समावेश आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने सेनेचा एक आमदार कमी झाला आहे.

2. भाजपप्रणित संख्याबळ ११३ :

भाजपचे संख्याबळ हे ११३ आहे. यात भाजप १०६, रासप १, जनसुराज्य पक्ष १ आणि अपक्ष ५ अशा आमदारांचा समावेश आहे. त्यांच्याकडे स्वतःची २२ आणि विरोधकांची ७ मत शिल्लक राहत आहेत. भाजपला तिसऱ्या जागेसाठी १३ मते कमी पडत आहेत.

3. ४ आमदार तटस्थ आणि १ जागा रिक्त

याशिवाय इतर म्हणजे जे आमदार तटस्थ आहेत त्यांचे संख्याबळ ४ आहे. यात एमआयएम २, कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) १ आणि मनसे १ अशा आमदारांचा समावेश आहे. तर शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने एक जागा रिक्त आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com