Prashant Jagtap sarkarnama
पुणे

प्रभाग रचना जाहीर होताच भाजपच्या १६ नगरसेवकांचा राष्ट्रवादीच्या जगतापांना फोन!

पुणे महापालिका प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे महापालिका प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. प्रभाग रचना चांगली झाली असून आम्ही १२२ जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त जगताप म्हणाले की, राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवावी, असे आम्हाला वाटते. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. आघाडी झाली तर आम्ही १३८ जागा जिंकू, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रभाग रचना जाहीर होताच भाजपतील (bjp) १६ नगरसेवकांनी जगताप यांना फोन केल्याची शहरात चर्चा रंगली आहे. (Ward structure of Pune Corporation announced: 16 BJP corporators call Prashant Jagtap)

महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आज (ता. १ फेब्रुवारी) जाहीर झाला आहे. प्रभाग रचना पाहता ती राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनुकूल असल्याची चर्चा रंगली आहे, तसेच भाजपनेही आपल्यासाठीही ही रचना सोयीचा असल्याचे सांगितले आहे. मात्र, प्रभाग रचना जाहीर होताच राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष जगताप यांनी पत्रकार परिषदेत घेत आघाडीचा सूर बदलत चक्क स्वबळाची भाषा केली आहे. त्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळाच्या भूवया उंचावल्या आहेत.

माजी महापौर जगताप म्हणाले की, प्रभाग रचना चांगली झाली आहे. ही प्रभाव रचना आरशासारखी स्वच्छ आहे. आम्ही १२२ जागा जिंकू. सन २०२१ ची जनगणना झाली, तर समाविष्ट गावांत जास्त प्रतिनिधी मिळू शकले असते. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी, असे आमचे मत आहे. याबाबत मी पुढील तीन दिवसांत सर्वांशी चर्चा करणार आहे. निवडणूकपूर्व आघाडीची चर्चा झाली; पण ती चर्चा पुढे गेली नाही. आघाडीबाबतचा निर्णय आमच्या पक्षाचे नेते घेतील.

आमची भूमिका स्वबळाची

निवडणुकीत आघाडी करायची की स्वबळावर निवडणूक लढवायची, याबाबतचा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे घेतील. तो निर्णय आम्हाला मान्य असेल. पण आमची भूमिका स्वबळाची आहे, ती आमच्या नेत्यांच्या कानावर घालू, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी वर्चस्व राखू

प्रशांत जगताप यांनी सांगितले की, मित्रपक्षांशी आघाडी झाली तर आमचे १३५ ते १३८ नगरसेवक निवडून येतील. स्वबळावर लढलो तर आम्ही १२२ जागा नक्की जिंकू, त्यातील १६ आयाराम असतील. आमचे १०३ नगरसेवक हे हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी येथील असतील. तेथील नगरसेवक पक्षात प्रवेश करत आहेत. आघाडी जरी झाली तर ११० जागांच्या खाली राष्ट्रवादी येणार नाही.

माझ्या उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील

भारतीय जनता पक्षासाठी ही स्थिती पूरक नाही. त्यांचे अनेक नगरसेवक पक्ष सोडतील, अशी स्थिती आहे. भाजपने आता त्यांचे जुने सहकारी सांभाळावेत. महापालिका निवडणुकीतील माझ्या उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. पण, मला यावेळी अध्यक्ष म्हणून काम करायचे आहे, असेही जगताप यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT