शिवसेनेच्या एकेकाला ठोकून काढा; सोडू नका : पूनम महाजनांचा आक्रमक पवित्रा!

शिवसेनेविषयी मी जाणूनबुजून बोलत नाही, असे काहीजण बोलतात. पण, मी बोलून आपला वेळ वाया घालवत नाही.
Poonam Mahajan
Poonam Mahajan sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेविषयी (shivsena) मी जाणूनबुजून बोलत नाही, असे काहीजण बोलतात. पण, मी बोलून आपला वेळ वाया घालवत नाही. याचा अर्थ मी कुणाच्या बाजूने आहे, असा होत नाही. नळावर भांडल्यासारखं ट्विटरवर भांडायचं, हे मला पटत नाही. शिवसेनेच्या विरोधात बोलायचं नाही, असे मी कधीही कार्यकर्त्यांना सांगितले नाही. मी तर म्हणते एकेकाला ठोका, सोडू नका, अशा शब्दांत भाजपच्या खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांनी शिवसेनेबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.(BJP MP Poonam Mahajan clarified her realtionship of Shiv Sena)

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात खासदार पूनम महाजन बोलत होत्या. महाजन म्हणाल्या की, महाविकास आघाडीची २०१९ मध्ये धोक्याने सत्ता आली. त्यानंतर कोरोना आला, त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात टाहो फोडायला सुरुवात केली. पण, कोरोनाकाळात फक्त भाजपचे कार्यकर्ते नागरिकांच्या मदतीला आले होते. त्यावेळी कोणीही पुढे आले नव्हते. शिवसेनेचा शाखाप्रमुखही रस्त्यावर उतरला नव्हता. मुख्यमंत्री तर घरात बसून होते.

Poonam Mahajan
वाद पेटला : पूनम महाजनांनी थेट ठाकरे परिवाराला घेतले शिंगावर

महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांचा अहंकार येऊ देऊ नका. ताकद दाखवण्याची महापालिका निवडणूक ही एक संधी आहे. त्यामुळे अहंकार त्याच्या आड येऊ देऊ नका. तिकिटावरून अहंकार निर्माण होऊ देऊ नका. काही महिन्यांपासाठी तो बाजूला ठेवा. आमच्यामुळे पूनम महाजन निवडणूक जिंकली असे शिवसेनावाले म्हणतात, तर मी म्हणते २०२४ मध्ये दोन हात करू. वांद्रे (पूर्व) भागात शिवसेनेची ताकद नाही, हे मी पूर्वीपासून सांगत आहे. मुंबई पालिका निवडणुकीच्या निमित्ताने हे त्यांना दाखवून देण्याची गरज आहे, असे त्यांनी भाजप कार्यकर्त्याला बजावून सांगितले.

Poonam Mahajan
भाजपची मोठी खेळी; अखिलेश यांच्याविरोधात थेट केंद्रीय मंत्र्यालाच तिकीट

पूनम महाजन म्हणाल्या की, राज्यात सत्तेत असलेल्या तीनही पक्षात मोठी लढाई आहे. त्यातील काही आपल्यालाच निवडणुकीत मदत करतील. शिवसेनेकडून भाजपच्या नेत्यांमागे पोलिसांचा ससेमिरा लावला जात आहे. आंदोलकांना मारहाण करून आपले मनोबल तोडण्याचे काम करत आहेत. अगदी ममता बॅनर्जीप्रमाणेच शिवसेना आपल्याला त्रास देणार आहे. ते कोणालाही सोडणार नाहीत, पण आपण गप्प बसून चालणार नाही, तर आपल्यालाही त्यांना तोडायला हवे. त्यांचा एक बॉल आला, तर आपले दहा बॉल त्यांच्यावर जातील, अशी ताकद आम्ही कार्यकर्त्यांना देऊ.

Poonam Mahajan
तीनदा विनंती करूनही दिलीप मानेंनी सभापतिपदाबाबतचा शब्द फिरवला!

मुंबई पालिकेवरच त्यांचे घर चालते

मुंबई त्यांची जान आणि शान आहे. मुंबई महापालिका त्यांच्या घरची रोजीरोटी आहे. मुंबईकरांच्या रोजीरोटीसाठी ते काही करत नाहीत. पण, त्यांचे घर मुंबई महापलिकेवरच चालते. पण, त्यांची चूल चालली पाहिजे की नागरिकांची चूल पेटली पाहिजे, याचा निर्णय आपल्याला करायचा आहे, असेही पूनम महाजन यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com