Pune hit and run case sarkarnama
पुणे

Pune Car Accident: पुणे अपघात प्रकरणी चौकशीसाठी आलेले आरोपीचे आजोबा म्हणाले, "आम्ही पोलिसांना..."

Porsche Hit And Run Case: सुरेंद्र अगरवाल यांनी आपल्या लाडक्या नातवाला जामीन मिळण्यासाठी तो अभ्यासात लक्ष देईल, वाईट संगतीपासून दूर राहिल, अशी 'गॅरंटी' दिली होती. त्याच आधारावर न्यायालयानं वेदांतला जामीन मंजूर केल्याचं बोललं जात आहे.

सागर आव्हाड

Pune Hit and Run Case: पुण्यातील कल्याणी नगर येथील 'हिट अँड रन' प्रकरणातील अल्पवयीन आरोपी वेदांत अगरवालची (Vedant Agarwal) काल बाल न्याय मंडळाकडून 14 दिवसांसाठी बालसुधार कक्षात (Juvenile Correctional Facility) रवानगी करण्यात आली आहे. तर आरोपीचे वडील विशाल अगरवाल याला काल कोर्टात हजर केल्यावर न्यायालयाने 3 दिवसाची पोलिस कोठडी दिली होती.

त्यानंतर आज वेदांतचे आजोबा सुरेंद्र अगरवाल (Surendra Agarwal) यांची आज पुणे पोलिसांकडून (Pune Police) चौकशी केली जात आहे. आरोपी वेदांत अगरवालचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांची आज पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. याबाबत सुरेंद्र अगरवाल यांना काही प्रश्न विचारले असता ते म्हणाले, "आम्ही पुणे पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहोत."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुरेंद्र अग्रवाल यांचे छोटा राजनशी संबंध?

ब्रह्मा बिल्डर्सचे मालक आणि अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी (Chhota Rajan) संबंध असल्याची माहिती उघड झाली होती. भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात सुरेंद्र अगरवाल यांनी छोटा राजनची मदत घेतली होती. या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं होत. आता पुणे पोलिसांकडून कल्याणीनगर (Kalyaninagar) येथील अपघाताबाबत सुरेंद्र कुमार यांची चौकशी केली जात असल्याचे सांगितले जात आहे.

नशेत बेदरकारपणे गाडी चालवत दोन जणांना चिरडल्यानंतर आरोपी वेदांतला अवघ्या काही तासातच किरकोळ अटी शर्तीवर जामीन मिळाला होता. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं. मात्र या जामिनासाठी आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांनी पुढाकार घेतल्याच्या चर्चा सुरु होत्या. तर सुनावनीवेळी सुरेंद्र अगरवाल यांनी आपल्या लाडक्या नातवाला जामीन मिळण्यासाठी तो अभ्यासात लक्ष देईल, वाईट संगतीपासून दूर राहिल, अशी 'गॅरंटी' दिली होती. त्याच आधारावर न्यायालयानं वेदांतला जामीन मंजूर केल्याचं बोललं जात आहे. अशातच आता आजोबांची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरु आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी नवा खुलासा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT