Pune Car Accident: पुण्याला 'गर्दुल्ल्यांचे माहेरघर' करू नका; दानवेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Pune Hit And Run Case: पुणे अपघात प्रकरणी देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत अंबादास दानवे यांनी एफआयआर संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाय यावेळी त्यांनी पुण्याची माजी महापौर आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावरदेखील निशाणा साधला आहे.
Devendra Fadnavis, Ambadas Danve
Devendra Fadnavis, Ambadas DanveSarkarnama

Ambadas Danve On Devendra Fadnavis News: पुण्यातील 'हिट अॅण्ड रन' प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. श्रीमंत बिल्डरच्या आरोपी मुलाला वाचवण्यासाठी पोलिस यंत्रणेवर राजकीय दबाव आणला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुण्यात धाव घेऊन या प्रकरणावर सविस्तर भाष्य केले होतं. यावेळी फडणवीसांनी आरोपीवर लावण्यात आलेल्या कलमांचा उल्लेखही केला होता.

गृहमंत्र्यांनी दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष एफआयआरमध्ये लावलेल्या कलमांवरून आता संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पत्रकार परिषदेचा संदर्भ देत एफआयआर संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाय यावेळी त्यांनी पुण्याची माजी महापौर आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावरदेखील निशाणा साधला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी म्हटलं आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत ठासून सांगतात की पुणे वेदांत अगरवाल प्रकरणात पोलिसांनी पहिल्यापासून कलम 304 लावलं मग एफआयआरमध्ये 304 हे कलम कुठे आहे? हे पुण्याच्या आयुक्तांनी सांगावं.

तसेच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे देखील 304 लावल्याची वकीली करत आहेत, मग ते एफआयारवर का अवतरले नाही? एफआयआरमध्ये हे कलम कुठे आहे, याचं उत्तर त्यांनीही द्यावं. कोणाची बाजू लावून धरत आहात, हे जरा पाहा. चुकीची पाठराखण करून पुण्याला 'गर्दुल्ल्यांचे माहेरघर' करू नका, अशा शब्दात दानवे यांनी फडणवीस आणि मोहोळ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

राहुल गांधींकडून दखल

तर या अपघाताच्या प्रकरणाची काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील घेतली आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी श्रीमंत आणि गरिबांना वेगवेगळा न्याय दिला जात असल्याचं म्हटलं होतं. तर गांधींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, या घटनेचं राजकारण कोणीही करु नये, तसंच प्रत्येक गोष्टीकडे मतांच्या चष्म्यातून पाहणं चुकीचं आहे.

देवेंद्रजी, पुणेकरांना दिलासा द्या, पब संस्कृती संपवा!

पुण्यात मध्यरात्री उशिरापर्यंत हे पब सुरू राहत आहेत. या भागातील नागरिकांनी अनेकदा यापूर्वी कारवाई व्हावी, अशी मागणी केली. विनंती केली. पण हे बेकायदेशीरपणे थाटामाटात सुरू आहेत. यांच्यामुळे अल्पवयीन मुलांचे आयुष्य बरबाद होत आहे. त्यामुळे शहरातील पब संस्कृती संपली पाहिजे, अशी मागणी मी पुणेकरांच्या वतीने गृहमंत्र्यांकडे करतो असं रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी म्हटलं होतं.

Devendra Fadnavis, Ambadas Danve
Pune Car Accident News: पुणे अपघातप्रकरणी आरोपीवर पुढील खटला कसा चालवणार? आयुक्तांनी स्पष्टचं सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com