Sangram Thopte-Balasaheb thorat Sarkarnama
पुणे

Injustice to Sangram Thopte : आमदार संग्राम थोपटेंवर आमच्याकडून अन्याय झाल्यासारखं वाटतंय; काँग्रेस नेत्याची कबुली

सरकारनामा ब्यूरो

Pune Politics : भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे लढाऊ बाण्याचे नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना मंत्रिपद मिळावं, अशी आमची अपेक्षा होती. त्यानंतर त्यांना विधानसभा अध्यक्ष आणि आता विरोधी पक्षनेतेपदावरूनही डावलण्यात आलेले आहे. त्यामुळे आमच्याकडून संग्राम थोपटे यांच्यावर अन्याय झाल्यासारखं वाटतंय, अशी जाहीर कबुली काँग्रेसचे विधीमंडळातील नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. (We have done injustice to MLA Sangram Thopte; Confession of a Congress leader)

माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, संग्राम थोपटे हे लढाऊ बाण्याचे नेते आहेत. आता ते सीनियरसुद्धा झाले आहेत. भोरच्या थोपटे कुटुंबीयांची परपंरा ही काँग्रेससोबत राहण्याची आहे. तसेच, सतत संघर्ष करण्याची आहे. संघर्ष करून ते टिकत आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळावं, अशी आमची अपेक्षा होती.

संग्राम थोपटे यांना विधानसभेचे अध्यक्ष करण्यासाठीसुद्धा आम्ही प्रयत्नशील होतो. आता विरोधी पक्षनेतेपदावरूनही त्यांना डावलण्यात आलेले आहे. मलाही असं वाटतंय की कुठंतरी संग्राम थोपटे यांच्यावर आमच्याकडून अन्याय झाल्यासारखंच मला वाटतं. पण, या सर्व गेलेल्या संधीची परतफेड काँग्रेस पक्षाकडून झाल्याशिवाय राहणार नाही. संग्राम थोपटे हे पुढच्या काळातील महत्वाचं नेतृत्व झाल्याशिवाय राहणार नाही, असा शब्दही आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला.

आमदार संग्राम थोपटे यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होता. मात्र, पुणे जिल्ह्यातील एका आमदारच्या विरोधामुळे त्यांचे मंत्रिपद हुकले होते. त्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पदासाठीही थोपटे इच्छूक होते. त्यांचे नावही चर्चेत होते. दिल्लीत जाऊन त्यांन विधानसभा अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र, शेवटपर्यंत विधानसभेचे अध्यक्षपदच भरले गेले नाही.

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे आले. त्यावेळी संग्राम थोपटे हे इच्छूक होते. त्यांनी आपल्याला ३० ते ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र पक्षनेतृत्वाला पाठविले होते. मात्र, ते पद विजय वडेट्टीवार यांच्याकडे गेले आणि संग्राम थोपटे यांना पुन्हा डावलण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT