CM-DCM On Onion Issue : गोयलांसोबत मुंडेंची बैठक सुरू असतानाच फडणवीसांनी निर्णय जाहीर केला; शिंदे-पवार म्हणतात ‘आमच्यात श्रेयवाद नाही’

Eknath Shinde-Ajit Pawar PC : कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले ४० टक्के शुल्क रद्द करावे, यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे. निर्णय व्हायला थोडा वेळ लागेल.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आमच्यात श्रेयवादाची कोणतीही लढाई नाही. श्रेयवादात अडकणारे आम्ही नाहीत, शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेत प्रथम क्रमांकाने लक्ष घालणारे आम्ही आहोत. श्रेयवादासाठी आम्ही हपालेलो नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. (We don't have a war of credit over onion's decision : Eknath Shinde, Ajit Pawar)

कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमधील लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. कांदा उत्पादकांना रोष कमी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी तातडीने दिल्ली गाठली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याबरोबर मुंडे यांची बैठक सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार २४१० रुपये दरांनी दोन लाख टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Bhosari Land Scam Case : भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट; खडसे दोषी की निर्दोष? दोन सप्टेंबरचा युक्तिवाद ठरवणार...

दरम्यान, कांदा प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे प्रयत्न करत असतानाच भाजपचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचा निर्णय जाहीर करून त्याचे श्रेय घेतल्याची चर्चा राज्यात सुरू झाली होती. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे आणि पवार यांनी स्पष्टीकरण दिले.

कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले ४० टक्के शुल्क रद्द करावे, यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे. निर्णय व्हायला थोडा वेळ लागेल. पण, आम्ही श्रेयवादासाठी हपालेलो नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच, कांद्याच्या प्रश्नावर आम्हाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सल्ला घ्यावा, असे वाटले आम्ही नक्की घेऊ, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Doctorate Degree To Fadnavis: मुख्यमंत्री शिंदेंपाठोपाठ फडणवीसही बनले डॉक्टर; उपमुख्यमंत्र्यांना जपानमधील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर

ज्या भागात टंचाईची परिस्थिती त्याचा आढावा घेतला जाणार आहे. चारा, पाणी टंचाईबाबत माहिती घेऊन उपाय योजना केल्या जातील. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली जाईल, असेही शिंदे-फडणवीसांनी सांगितले.

राजकारण न करता सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. शरद पवार हेही केंद्रात कृषिमंत्री होते, त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण, त्यावेळी असा निर्णय झाला नव्हता, त्यामुळे आता या प्रकरणात राजकारण करू नये. शरद पवार यांनीही सरकारच्या निर्णयाचे स्वागत करावं, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Mahajan Big Statement On NCP: गिरीश महाजनांचे राष्ट्रवादीबाबत मोठे विधान; ‘अजितदादा म्हणजेच राष्ट्रवादी; शरद पवार गटच पक्षाबाहेर’

साखर कारखान्याचा प्राप्तीकर माफ करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती. तो निर्णय तातडीने झाला होता, त्यामुळे शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणी राजकारण करू नये. शेतकऱ्यांना मदत करावी. राज्य सरकारला काही सूचना करावी, त्या सूचनांचा नक्कीच विचार कला जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com