Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sarkarnama
पुणे

Chandrashekhar Bawankule : आम्ही संपूर्ण निवडणुकीत कधीही हिंदुत्वाविषयी चर्चा केली नाही; बावनकुळेंचा दावा

सरकारनामा ब्यूरो

kasba and chichwad by election News : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून आज (शुक्रवारी) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. तर रविवारी मतदान होणार आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांनी मागील काही दिवसांपासून पुण्यात तळ ठोकला आहे.

या पार्श्वभूमीवरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हेमंत रासने यांच्या प्रचारात बोलताना कसबा पोटनिवडणुकीत भाजप आणि महायुती १०० टक्के जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसह शरद पवार यांच्यावर टीका केली.

बावनकुळे म्हणाले, ''कसब्यातील जनतेवर आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे कसबा निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुती जिंकेल. पुनर्विकास जो इथे थांबला आहे. तो आता केंद्र सरकार आणि शिंदे - फडणवीसांच्या सरकारकडून पूर्ण होणार आहे. आम्ही कधीही संपूर्ण निवडणुकीत हिंदुत्व या विषयी चर्चा केली नाही'', असा दावाही यावेळी त्यांनी केला.

''मुस्लिम समाजाचे नाव घेऊन हिंदूंच्या विरोधी चर्चा आम्ही कधीच केली नाही. आम्ही कधीही हिंदुत्ववादी विरुद्ध इतर असा चेहरा तयार केला नाही. त्यामुळे कसब्यात एकही ब्राम्हण मतदार नाराज नाही. मी २८ बैठका यावेळी घेतल्या. पण कसब्याचा विकास डबल इंजिनचे सरकार करणार आहे, हीच लाईन होती'', असंही ते म्हणाले.

दरम्यान, कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे आता बाजी कोण मारणार? हे निकालानंतर पाहायला मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT