Ramdas Athawale : शरद पवारांनी 'ही' बाब अजितदादांना सांगायला हवी होती; रामदास आठवलेंचं मोठं विधान

Chinchwad By Election : ...तरीही २०२४ ला पुन्हा भाजपच सत्तेत येणार!
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama

Ramdas Athawale News : ''मी देत आहेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला शाप, कारण निवडून येणार आहेत अश्विनी जगताप, नरेंद्र मोदी आहेत विरोधकांचे बाप, कारण निवडून येणार आहेत अश्विनी जगताप...'' अशा काव्यपंक्तींनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांना टोला लगावला. तसेच यावेळी आठवलेंनी शरद पवार,अजित पवारांवर निशाणाही साधला.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या दिग्गज नेत्यांची गुरुवारी( दि.23) रात्री सांगवीत सभा झाली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा `आरपीआय`चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी काव्यपंक्तीद्वारे विरोधकांवर टीका केली.

Ramdas Athawale
Jitendra Awhad : सर्वोच्च न्यायालयाचा आव्हाडांना झटका; अनंत करमुसे मारहाण प्रकरणी दिले 'हे' निर्देश

रामदास आठवले(Ramdas Athawale) म्हणाले, ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका होती. पण,अजित पवार म्हणाले,होऊन जाऊ द्या.तर आता होऊनच जाऊ द्या. यावेळी येथे उमेदवार देऊ नये असे पवारसाहेबांनी अजितदादांना सांगायला हवं होतं असं ते म्हणाले. काहीही करा, कितीही शिव्या द्या,तरीही २०२४ ला पुन्हा भाजप सत्तेत येऊन मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार, ते झाले की मी ही मंत्री होणार असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला. मी कॉंग्रेसबरोबर होतो,पण ते माझे ऐकत नव्हते असा टोलाही लगावला.

Ramdas Athawale
Congress : शिंदे-फडणवीस सरकारने रोखली होती ‘या’ आमदारांची कामे, उच्च न्यायालयाने दिला दिलासा !

बाबासाहेब आंबडेकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याचा प्रयत्न सध्याचे केंद्र सरकार व पंतप्रथान नरेंद्र मोदी हे करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येत आहे. तो आठवलेंनी यावेळी खोडून काढला.कोण म्हणतो बाबासाहेबांचे संविधान हे सरकार बदलणार आहे,ते कोणी बदलू शकत नाहीत,असे ते म्हणाले.उलट मोदी ते आणखी मजबूत करीत आहेत अशी पाठराखण आठवलेंनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com