BJP, Madhav Bhandari Latest News Sarkarnama
पुणे

बारामतीच नव्हे, महाराष्ट्रातल्या सर्वच जागा आम्हाला जिंकायच्या आहेत...

Madhav Bhandari : आम्ही सर्वच मतदारसंघात ताकद वाढवणार...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman)या गेल्या दोन दिवसापासून बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याची जोरदार चर्चा होत आहे. यावरून भाजपने (BJP) बारामती (Baramati) जिंकण्याचा निर्धार केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान आम्हाला बारामतीच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व जागा आम्हाला जिंकायच्या आहेत,असा विश्वास भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केला आहे. भंडारी हे पत्रकार परिषदेत बोलत होते. (BJP, Madhav Bhandari Latest News)

भंडारी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशासकीय कार्यकिर्दीला 20 वर्षे पुर्ण झाली असून त्यांनी व्यवस्था बदलासाठी त्यांनी काय केलं हे सांगण्यासाठी देशभरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

बारामती हेच केवळ आमचे उद्दिष्ट नाही तर महाराष्ट्रातील सर्वच जागा जिकण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आम्ही सर्वच मतदारसंघात ताकद वाढवू जर ती जागा मित्र पक्षाला मिळाली तर त्याचा फायदा मित्र पक्षाला होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भाजपकडून आगमी लोकसभा निवडणुकीसाठी देशातील काही निवडक मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे १६ जागांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांचा बालेकील्ला असलेल्या बारामतीवर भाजपने लक्ष घातलं आहे. आणि याची जबाबदारी चक्क अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यावर गेण्.ाक आली आहे. याच कारणांनी त्या तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून मात्र, महाविकास आघीडीचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगत आहे. सितारमण यांच्या दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT