आपण कोणत्या तोंडाने आंदोलन करताय?, निलंगेकरांनी काँग्रेसच्या आमदारांना सुनावले...

Sambhaji Nilangekar : काँग्रेसच्या आमदारांनी अतिवृष्टीचे संकटाबाबत कधी विधानसभेत आवाज उठवला का?
Sambhaji Patil Nilangekar Latest News
Sambhaji Patil Nilangekar Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

निलंगा : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यावर नैसर्गिक आपत्तीचे संकट वेगवेगळ्या माध्यमातून आले कोणतेही नैसर्गिक संकट पक्ष पाहून येत नाही जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या (Congress) आमदारांनी अतिवृष्टीचे संकटाबाबत कधी विधानसभेत आवाज उठवला का? अथवा मुख्यमंत्र्याकडे निवेदन तरी दिले का?, असा सवाल उपस्थित करून कोणत्या तोंडाने आंदोलन करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करताय, अशी खोचक टिका माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी शुक्रवारी (ता. 23 सप्टेंबर) रोजी केली. संभाजी पाटील निलंगेकरांचा फेसबुक लाईव्हद्वारे शेतकरी बांधवाशी संवाद साधतांना बोलत होते. (Sambhaji Patil Nilangekar Latest News)

Sambhaji Patil Nilangekar Latest News
शरद पवारांच्या टीकेला सीतारामन यांनी बारामतीत येऊन असे दिले उत्तर

ते म्हणाले की, कोणतेही नैसर्गिक संकट हे पक्ष पाहून येत नाही लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरिप पीकावर यंदा वेगवेगळ्या माध्यमातून आपत्ती आली. काही भागात अतिवृष्टी, काही भागात शंखी गोगलगाय तर काही ठिकाणी संततचा पाऊस यामुळे मोठे नुकसान झाले सध्याचे सरकार संवेदनशील असून शंभर टक्के सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. याबाबत आपण १२ जुलै रोजी स्वतः मुख्यमंत्र्याकडे निवेदन देऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची विनंती केली. शिवाय औशाचे आमदार अभिमन्यू पवार व विधान परिषदेचे आमदार रमेश अप्पा कराड यांनीही निवेदन व लक्षवेधी मांडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी केली.

Sambhaji Patil Nilangekar Latest News
राष्ट्रवादीकडून व्हायरल फोटोवर श्रीकांत शिंदेचं स्पष्टीकरण : 'ते तर घरचं कार्यालय...'

लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन व काँग्रेसचे दोन आमदार आहेत. काँग्रेसच्या आमदारांनी कधी याबाबत नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आवाज उठवला का? अथवा मुख्यमंत्र्याकडे, उपमुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे तरी विरोधी पक्षाची भुमिका म्हणून मागणी केली का? असा सवाल उपस्थित करून सध्या जिल्ह्यामध्ये अनुदान प्रश्नांवरून काँग्रेसकडून आंदोलन केले जात असून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय आपण कोणत्या तोंडाने आंदोलन करताय, अशी खोचक टिका त्यांनी यावेळी केली.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी, गोगलगाय नुकसान व सततचा पाऊस या तिन विभागणीद्वारे नुकसान भरपाई मिळणार आहे. अतिवृष्टी व गोगलगायचे अनुदान आले आहे. लवकरच सततच्या पावसाचेही अनुदान मिळेल शेतकऱ्यांनी निश्चिंत रहावे सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मिळणार आहे तेंव्हा विनाकारण शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नका, असे अवाहनही त्यांनी यावेळी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com