Alandi Ashadhi Wari news  Sarkarnama
पुणे

Alandi Warkari Viral Video: आम्हाला एकांतात नेऊन मारलं ? ; वारकऱ्यांचा गंभीर आरोप ; आळंदीत नेमकं काय घडलं ; Video व्हायरल..

Alandi Ashadhi Wari: पोलिसांनी आम्हाला का मारले याचे उत्तर द्यावे,

सरकारनामा ब्यूरो

Alandi Video Viral: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळ्याला रविवारी गालबोट लागले. यावरुन राजकारण पेटलं आहे. वारी सोहळ्यात इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यावरुन संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.

पोलिसांनी वारकऱ्यांवर केलेल्या हल्ल्याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका तरुण वारकऱ्याने त्याच्यावर पोलिसांनी केलेल्या मारहाणीबाबत सांगितले आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापत आहे.

मारहाण झालेल्या या वारकऱ्याचा व्हिडिओ हायरल होत आहे. जवळपास १५ ते २० पोलिसांनी चार वारकऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप विशाल रावसाहेब पाटील या तरुण वारकऱ्याचे केला आहे.

"पोलिसांनी आम्हाला का मारले याचे उत्तर द्यावे," अशी मागणी विशाल पाटील याने केली आहे. "आळंदीत माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्या वेळी मंदिराच्या बाहेर अचानक पोलिसांच्या दिशेने बॅरिगेट्स तोडून तरुण वारकऱ्यांचा घोळका धावत आला. पोलिसना त्यांना अडवण्यासाठी लाठीचा वापर केला. त्यामुळे पोलिस आणि वारकरी यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी वारकऱ्यांना बाजूला केले. मात्र काही तरुण वारकऱ्यांना बाजूला नेऊन मारहाण केली," असे विशाल पाटील यांचे म्हणणं आहे.

आळंदी येथून रविवारी संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने पंढरपूरच्या वारीसाठी प्रस्थान ठेवले. या वारी सोहळ्याला गालबोट लागले आहे. वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या घटनेवर संतापले आहेत . ते माध्यमांशी बोलत होते.

आळंदीमध्ये वारकरी आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये वाद झाला. यानंतर वारकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये काही वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांची तसेच महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. भाजपने धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी टोळी निर्माण केली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांची फेसबूक पोस्टवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. पवारांनी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीवर टीका केली आहे. "

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT