Pune NCP office(संग्रहित) Sarkarnama
पुणे

Pune NCP Office Dispute : पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा नेमका वाद काय? वाचा सविस्तर

Prashant Jagtap and Deepak Mankar : करारनामा संपला, भाड्याचं घर खाली करा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकरांची मागणी

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यामध्ये काँग्रेस भवन प्रमाणे आपलेही प्रशस्त कार्यालय असावे या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसने दोन वर्षांपूर्वीे डेंगळे पुलाजवळ राष्ट्रवादी भवन हे कार्यालय उभारले आहे. याचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. कार्यालय जरी राष्ट्रवादीचं असलं तरी या कार्यालयाचा करारनामा मात्र तत्कालीन अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाने केला गेला. Pune NCP Office Dispute

त्यावेळी राष्ट्रवादी एकत्र असल्याने याबाबत जास्त कोणी आक्षेप घेतला नाही. मात्र आता राष्ट्रवादीतच फूट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून हे कार्यालय आपल्याकडे ठेवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आणि आता अजित पवार गटाकडून जगताप यांनी फसवणूक करून पक्षाचे नावे करार न करता स्वतःच्या नावे करार केल्याचा आरोप केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आता हा नवीन दावा केला आहे. या दाव्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे हे कार्यालय भाडे तत्त्वावर घेतलेल्या जागेवर असून त्याचा करारनामा आता संपला आहे. त्यामुळे जागा मालकाशी संपर्क करून नवीन करारनामा आम्ही आमच्या नावे करून सध्या कब्जा करून बसलेल्या प्रशांत जगताप यांना भाड्याचे घर खाली करायला लावू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील वाद विकोपाला जाताना पाहायला मिळतोय. अशातच प्रशांत जगताप यांनी पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावरून घड्याळाचे चिन्ह काढून टाकले आहे.तसेच काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांचे नाव असलेले कोनशीला देखील फोडली होती. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालय भवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान कार्यालयाच्या वादाबाबत दोन्ही गटांकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार प्रशांत जगताप यांनी सांगितले की 2021 साली मालकाकडून करारनामा करून हे कार्यालय माझ्या नावे महाराष्ट्र सरकारच्या दरबारी रजिस्टर आहे. त्याची मुदत अजून प्रलंबित आहे. हे ऑफिस प्रशांत जगताप यांच्या नावावरती असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावावरती नाही. त्यामुळे बेकायदेशीररित्या जरी या कार्यालयावर कोणी कब्जा करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देऊ प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

तर दुसरीकडे अजित पवार गटाचे शहर प्रमुख दीपक मानकर यांनी सांगितलं की, आम्ही त्या कार्यालयवरती ताबा मारण्याचा प्रश्न येत नाही. मात्र प्रशांत जगताप ज्या कार्यालयबाबत दावा करत आहेत. त्या कार्यालयाचा भाडेकरारनामा संपुष्टात आला आहे. त्या कार्यालयाचा बेकायदेशीररित्या वापर जगताप करत आहेत. त्यामुळे संबंधित मालकाने भविष्यामध्ये आमच्यासोबत करारनामा केला तर त्या कार्यालयाचा ताबा आम्ही घेऊ.

एका भाडेकरूने कार्यालय सोडल्यानंतर दुसरा भाडेकरूला ते घेण्याचा अधिकार असतो. मात्र प्रशांत जगताप यांनी ते कार्यालय स्वतःच्या नावे करारबद्ध करून शरद पवार आणि अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक केली आहे, असा आरोप मानकर यांनी केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT