Shivsena UBT : पुण्यात ठाकरे गटाकडून सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम; गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला!

Signature campaign against government : सत्ताधारी पक्षातील आमदार चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत, असाही आरोप करण्यात आला आहे.
Shivsena UBT
Shivsena UBTsarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय गुंडशाही, गुंडशाही व भ्रष्टाचार खुलेआम सुरू आहे. नितेश राणेंसारखे नेते चिथावणीखोर भाषणं करत आहेत. भाजपाच्या आमदाराने तर पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार केला. असे सांगत या घटनांचा निषेध म्हणून पुण्यात उद्धव ठाकरे गटाच्यावतीने स्वाक्षरी आंदोलन करण्यात आले.

उद्धव ठाकरे गटाकडून गुरुवारी शहरात दोन ठिकाणी अशा प्रकारचे स्वाक्षरी आंदोलन घेण्यात आले. पुढील कालावधीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये अशी आंदोलन घेणार असल्याचं शहर प्रमुख संजय मोरे यांनी सांगितलं. महायुती सरकारच्या कारभारावर टीका करताना संजय मोरे म्हणाले, 'महाराष्ट्रामध्ये वाढलेली गुंडशाही, झुंडशाही आणि बोकाळलेला भ्रष्टाचार यावर सरकारचा अंकुश राहिलेला नाही. सत्ताधारी पक्षातील आमदार चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत.

सागर बंगल्यावरती असलेल्या आपल्या बॉसमुळे आपल्याला कोणाची भीती नाही. आपलं कोण वाकड करू शकत नाही अशी त्यांची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे ठाण्यामधील भाजपा आमदाराने पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याचं प्रकरण घडलं आहे. या घटनेचा आम्ही यापूर्वी निषेध केला. मात्र चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा यासाठी नागरिकांची स्वाक्षरी मोहीम आंदोलन करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivsena UBT
Vasant More Status : शर्मिला ठाकरेंचे ‘ते’ विधान अन्‌ वसंत मोरे म्हणतात ‘पुणे की पसंत...मोरे वसंत’

सध्या राज्यातील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री गुंडांना एकत्र करत आहेत. मात्र गुंडांसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण अंगलट येत असल्याचं जाणवल्यानंतर, पुण्यातील पोलीस आयुक्तांना आदेश देऊन या गुंडांना एकत्र करून तंबी देण्यात आली. असं संजय मोरे म्हणाले. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अथवा मंत्रालयामध्ये अशा प्रकारे गुंडांना प्रवेश मिळतोच कसा? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुका या गुंडांच्या माध्यमातून लढवून नागरिकांवरती दबाव आणणार आहात का? असा सवाल मोरे यांनी केला.

याशिवाय, सध्या सरकारला गुंडांची आणि गुंडांना सरकारची गरज असल्याचे चित्र दिसत आहेत. मी तुझा, तू माझा या भावनेतून आपण या महाराष्ट्रावरती राज्य करू. असा प्लॅन सरकारचा असल्याची टीका मोरे यांनी केली. या सगळ्या सरकारच्या धोरणांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.आणि हा रोष व्यक्त करून देण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. या स्वाक्षरी मोहिमेतून सरकारला त्यांचा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचं मोरे यांनी सांगितलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Shivsena UBT
Pune Police News : पोलिस आयुक्तांच्या 'परेड'नंतर काही तासांतच नीलेश घायवळने दाखवला ‘दम’!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com