Ajit Pawar sarkarnama
पुणे

Ajit Pawar : 'उकिरडे उकरत बसायचे नसतात', PM मोदींच्या प्रश्नावर अजितदादा संतापले

AJit Pawar On PM Narendra Modi : अजित पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी झालेल्या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी संताप व्यक्त करत उकिरडे उकरत बसायचे नसतात अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : वडगाव शेरी (Vadgaon Sheri) मतदारसंघामध्ये 300 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी माध्यमांकडून अजित पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी झालेल्या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी संताप व्यक्त करत उकिरडे उकरत बसायचे नसतात अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आज पुणे दौऱ्यादरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलं. अजित पवार म्हणाले, आज प्रशासनासोबत दोन ते तीन बैठका घेण्यात आल्या या बैठकांमध्ये 'पीएमपीएल' कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा फरक देण्याबाबत चर्चा करण्यात आली. सातवा वेतन आयोगाचा फरक देण्याचा निर्णय झाला असला तरी तो अद्याप देण्यात आलेल्या नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थ असून हा फरक तातडीने देण्यात यावा असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील कायम करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामध्ये शहरातील काही भागातील घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी गेल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या पूरग्रस्तांना आज चेक आणि 'डीपीटी' द्वारे नुकसान भरपाई देण्यात आली असल्याचं अजित पवार यांनी सांगितले.

सहाय्यक पोलीस निरीक्षणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याच्या घटनेवर बोलताना अजित पवार म्हणाले, 'काल घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या संदर्भातील आरोपीला कडक मधली कडक कारवाई केली जाणार आहे. पोलिसांचा दबाव हा गुन्हेगारांवर असलाच पाहिजे. गुंड प्रवृत्तीचे जे लोकं आहेत. अशांवर कारवाई करणे हे आमचे काम आहे. परंतु याबाबतची अधिक माहिती पोलीस आयुक्तांकडून घेणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

आज झालेल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या फ्लेक्समध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांचा फोटो वापरण्यात आले नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून युती धर्म पाळला जात नसल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केला होता. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, हे सरकारचे कार्यक्रम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी आमच्या स्तरावरती काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार जो कार्यक्रम ज्या विभागाचा असतील त्यांचीच नाव त्या ठिकाणी असतील. त्यामुळे या गोष्टीला जास्त महत्व देण्याची गरज नाही. मुख्यमंत्री आणि आम्ही दोन उपमुख्यमंत्र्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. तसेच हा कार्यक्रम भूमिपूजनाचा होता. त्यामुळे ज्यावेळेस उद्घाटनाचा कार्यक्रम असेल त्यावेळेस प्रोटोकॉल नुसार सगळ्यांचे फोटो वापरले जातील असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.

पोर्शे अपघात प्रकरणांमध्ये सरकारने काही लोकांना पाठीशी घातला असल्याचं आरोप माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, हे धादांत खोटे आहे. या प्रकरणांमध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. याबाबत जर कुणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत असं अजित पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे काल महाराष्ट्र दौऱ्यावरती होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्रित होते. त्यामुळे भटकती आत्मा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याबाबत अजित पवार जाब विचारणार असल्याचे समोर आले होते. त्यामुळे तुम्ही मोदींना भटकती आत्मा या वक्तव्याबाबत विचारलं का ? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता अजित पवार म्हणाले, हे निवडणुकांपूर्वी केलेले वक्तव्य होतं. त्यानंतर पुलाखालून खूप सारे पाणी वाहून गेलं आहे. तुम्ही कदाचित ते पाहिलं नसेल किती पाणी वाहून गेला आहे. मात्र आता तो विषय संपलेला आहे. आमच्या ग्रामीण भागाच्या भाषेत म्हणतात की उकिरडा उकरत बसायचं नसतं. या जुन्या गोष्टी असून त्या मागे पडल्या असून निवडणुका झाल्या निकाल झाला त्यामुळे आता नवीन काहीतरी विचारा असे उत्तर अजित पवार यांनी दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT