AAP Candidate List : आता जम्मू-काश्मीर सर करण्यासाठी 'आप' सज्ज; सात उमेदवार जाहीर

Assembly Election 2024 AAP Candidate List : 'आप'ने जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर, 7 जागांची घोषणा. फयाज अहमद सोफी आणि राजपुरातून मुद्दसिर हसन यांना तिकीट.
Assembly Election 2024 AAP Candidate List
Assembly Election 2024 AAP Candidate ListSarkarnama
Published on
Updated on

Jammu and Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. सात जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पुलवामामधून फयाज अहमद सोफी आणि राजपुरातून मुद्दसिर हसन या उमेदवारांचा पहिल्या यादीमध्ये समावेश आहे.

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir Election) पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यातील निवडणूक 18 सप्टेंबरला होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक 25 सप्टेंबरला होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होणार आहे. यासोबतच 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. आम आदमी पार्टीने (AAP) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यांनी सात जागांसाठी उमेदवार जाहीर केले.

Assembly Election 2024 AAP Candidate List
Jammu and Kashmir Election : भाजपची 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; दोन काश्मिरी पंडितांना तिकीट

आम आदमी पार्टीची पहिली यादी

पुलवामा विधानसभा मतदारसंघातून फयाज अहमद सोफी, राजपुरातून मुद्दसिर हसन, देवसर शेख फिदा हुसेन, दोरूमधून मोहसीन शफकत मीर, दोडामधून मेहराज दिन मलिक, दोडा पश्चिममधून यासिर शफी मट्टो आणि बनिहालमधून मुद्दसिर अजमत मीर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या निवडणुकींमध्ये सर्व उमेदवारांना येथे सुरक्षा देण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. यासोबतच सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात येणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाने (Election Commission) जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात 360 मॉडेल मतदान केंद्रे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. येथे विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. त्यापैकी 74 सर्वसाधारण, 9 एसटी आणि 7 अनुसूचित जातींसाठी राखीव असणार आहेत.

Assembly Election 2024 AAP Candidate List
Jammu Kashmir Elections : 'जम्मू आणि काश्मीर' फत्तेसाठी राष्ट्रवादीचे '25 स्टार' मैदानात

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. यापूर्वी 2014 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. मात्र, 2024 च्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष रिंगणात आहेत. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स युती करून निवडणूक लढवत आहेत. पीडीपी, भाजप, गुलाम नबी आझाद यांचा पक्ष डीपीएपी, अपनी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि इतर काही पक्षही रिंगणात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com