devendra fadnavis ajit pawar supriya sule sarkarnama
पुणे

Supriya Sule News : पुण्यात अनेक घटना घडल्या, पालकमंत्री कुठे आहेत..? 'हिट अँड रन' प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंची प्रश्नांची सरबत्ती

Sachin Waghmare

Pune News : लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील तापलेलेच आहे. निवडणुकीनंतर सत्ताधारी व विरोधक आरोपाची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच गेल्या आठवडयात पुणे शहरात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणानंतर एकमेकांवर टीका केली जात आहे.

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पालकमंत्री अजित पवार (Ajit pawar), गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना धारेवर धरत काही प्रश्न विचारले आहेत.

पुणे शहरात शनिवारी मध्यरात्री बिल्डर असलेल्या विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवत एका बाईकला धडक दिली. यामध्ये बाइकवर असलेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्थाला या दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात बालसुधार गृहात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पुढे काय होणार ? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Supriya Sule News)

दरम्यान, या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यामध्ये अनेक घटना घडल्या आहेत पण पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे. या माध्यमातून त्यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके कोणाबद्दल बोलत होते ? राजकीय दबाव नेमका कुणाचा आहे? असा सवाल करत फडणवीसांनी याचे उत्तर द्यावे, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कुणी फोन केला ?

या प्रकरणावरून कुणी फोन केला ? कुणामुळे जामीन मिळाला हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यातील वातावरण या घटनेमुळे तापले असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्री व गृहमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे.

SCROLL FOR NEXT