Satara Loksabha News : मान कोणाला, मत कोणाला? साताऱ्यात कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढली

Udayanraje Bhosale : सातारा लोकसभेच्या मतदानानंतर सध्या विधानसभा निहाय कोणाला किती मताधिक्य मिळेल याची गणिते जुळविण्यात स्थानिक नेते व्यग्र आहेत
Udayanraje Bhosale, Shashikant Shinde
Udayanraje Bhosale, Shashikant Shindesarkarnama

Satara Political News : निकालाची तारीख जवळ येऊ लागली आहे, तसतशी सातारा लोकसभा मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता वाढू लागली आहे. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde या दोघांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघनिहाय आकडेमोड करुन आम्हीच आघाडी घेऊ, असे म्हणत विजय आमचाच आहे. असे सांगण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे सातारच्या जनतेने राजघराण्याला मान दिलाय की सर्वसामान्य उमेदवाराला मतांचे दान दिलंय, याचीच चर्चा सध्या साताऱ्यात रंगली आहे.

Udayanraje Bhosale, Shashikant Shinde
Gajanan Kirtikar News : दरेकरांनी कीर्तिकरांवर केलेल्या आरोपातील संजय शिरसाटांनी हवाच काढली !

सातारा लोकसभेच्या Satara Loksabha मतदानानंतर सध्या विधानसभा निहाय कोणाला किती मताधिक्य मिळेल याची गणिते जुळविण्यात स्थानिक नेते व्यग्र आहेत. गावागावात परावर याची चर्चा सध्या रंगली आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale, आमदार शशिकांत शिंदे यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. दोन्ही बाजूकडून विजयाचा दावा होऊ लागला आहे. कोणी म्हणतंय तुतारी 80 हजारांनी लागेल, तर कोणी म्हणतंय महाराज सव्वा लाखांवर लीड घेतील.

या दाव्यांबाबत विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेमोडही कार्यकर्ते करुन दाखवत आहेत. खरेतर सातारा लोकसभेचे गणित आजपर्यंत कराडच्या दोन आणि पाटण या मतदारसंघांवरच अवलंबून होते. पण, यावेळेस दोन्ही उमेदवार सातारा व जावळी तालुक्यातील असल्याने आता सातारा, वाई व कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून दोघांपैकी कोण मताधिक्य घेणार त्यावर विजयाचे गणित अवलंबून आहे.

सध्या मतदान यंत्रे ठेवलेल्या ठिकाणी निवडणूक विभागाने सीसीटीव्हीचा वॉच ठेवला आहे. तरीही या यंत्रणेवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आमदार शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी जागता पहाराच ठेवला आहे. भाजपकडून ईव्हीएम घोटाळा होण्याचा धोका असल्याचे समजून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने तेथे खडा पाहरा ठेवला आहे. त्यासाठी दररोज राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

त्यामुळे सातारा लोकसभेच्या या निवडणुकीत सातारकरांनी कोणाला साथ दिली आणि कोणाला मान दिला, हे चार जूनलाच समजणार आहे. पण, जसजशी मतमोजणीची तारिख जवळ येऊ लागली आहे. तसतशी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिंदे यांच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता वाढू लागली आहे. प्रत्येकजण आपल्याच नेत्याच्या विजयाचा दावा आकडेवारीसह करु लागला आहे.

(Edited By Roshan More)

Udayanraje Bhosale, Shashikant Shinde
Pune Hit And Run Case : 'बिल्डर का बेटा हूँ 'भाई',इसलिए...'; धक्कादायक व्हिडिओ 'त्या' अल्पवयीन मुलाचाच?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com